कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर उद्या जम्मू-काश्मीरला भेट देणार
Posted On:
06 NOV 2022 7:38PM by PIB Mumbai
केंद्रीय उद्योजकता आणि कौशल्य विकास तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर उद्या जम्मू आणि काश्मीरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार असून या दरम्यान ते कौशल्य, नवोन्मेश आणि उद्योजकता क्षेत्रातल्या घडामोडी व्यापक करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारी अधिकारी, विद्यार्थी आणि इतर भागधारकांशी संवाद साधतील.
यावेळी राजीव चंद्रशेखर हे मुमकीन, उज्ज्वला, आप की जमीन, आप की निगरानी योजना आदी सरकारी योजनांच्या प्रमुख लाभार्थ्यांना भेटणार आहेत.
ते चंदरकोट येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधतील, तसेच त्यांनी बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन करणाऱ्या स्टॉलला भेट देतील. विविध कंपन्यांमध्ये कुशल तरुणांच्या नियुक्तीसाठी मंत्री, रोजगार मेळ्याचे ते उद्घाटन करणार आहेत.
यानंतर चंद्रशेखर पटनीटॉपला रवाना होतील जिथे ते पंचायती राज संस्थांच्या प्रतिनिधींव्यतिरिक्त हॉटेल व्यावसायिक, युवा आणि टुरिझम क्लबच्या सदस्यांशी संवाद साधतील. जम्मूमध्ये, मंत्री प्रादेशिक कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय आणि राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था यांच्या प्रशिक्षणार्थी आणि अधिकार्यांशी संवाद साधतील त्याचबरोबर उपलब्ध संसाधने आणि स्थानिक लोकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकासासंबंधी होणाऱ्या प्रयत्नांवर देखील चर्चा करतील.
***
S.Kane/V.Yadav/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1874141)
Visitor Counter : 180