इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर दुबईत भारतीयांसमवेत झालेल्या कार्यक्रमात झाले सहभागी
उत्साहवर्धक नेतृत्व आणि धाडसी सुधारणांमुळे भारत आज जगासाठी विकासाचा दीपस्तंभ बनला आहे: विश्व सद्भावना कार्यक्रमात चंद्रशेखर यांचे प्रतिपादन
Posted On:
06 NOV 2022 4:24PM by PIB Mumbai
भारत आज जगासाठी विकासाचा दीपस्तंभ बनला आहे, आणि हे एक उत्साहवर्धक नेतृत्व आणि धाडसी सुधारणांमुळे शक्य झाले आहे, ज्यामुळे भारतावरचा अकार्यक्षम लोकशाहीचा पूर्वीचा शिक्का पुसून गेला आहे,असे प्रतिपादन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर केले आहे.
दुबईत शनिवारी झालेल्या विश्व सद्भावना कार्यक्रमात दुबईस्थित भारतीय समूहाला संबोधित करताना राजीव चंद्रशेखर म्हणाले, “भारत आता एका वळणावर आहे.आज आपण जिथे आहोत तिथून, पुढे येणाऱ्या अमृत काळाच्या 25 वर्षात,भारत फक्त पुढे जाऊ शकतो आणि हा त्याच्या विकासाच्या प्रवासातील एक नैसर्गिक टप्पा असेल."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, व्यापक सुधारणा आणि डिजिटल इंडिया, स्किल्स इंडिया, स्टार्ट-अप इंडिया इत्यादी सरकारच्या प्रमुख कार्यक्रमांच्या यशाचा पुनरुच्चार करत चंद्रशेखर पुढे म्हणाले की,या उपक्रमांमुळे डळमळीत,अकार्यक्षम लोकशाही असे भारताचे पूर्वी केले जाणारे वर्णन आता आमूलाग्र बदलले आहे. भारत आज एक अशा देशाचे "चालते बोलते उदाहरण" आहे जो केवळ बहुविध, धर्मनिरपेक्ष आणि वैविध्यपूर्ण तर आहेच त्याचबरोबर आर्थिक विकास साध्य करणारा नवोन्मेशी,विकास आणि समृद्धीकडे वाटचाल करणारा देश देखील झाला आहे.
यावेळी भारतीय दुबईस्थित समूह प्रचंड संख्येने उपस्थित होता आणि या कार्यक्रमात,श्री चंद्रशेखर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 20 वर्षांच्या नेतृत्वाच्या प्रभावाविषयी, 'मोदी@20: ड्रीम्स मीट डिलिव्हरी' आणि 'हार्टफेल्ट: द लेगसी ऑफ फेथ' या दोन पुस्तकांचे प्रकाशनही केले. एनआयडी फाऊंडेशन या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
दुबईच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर असलेल्या,चंद्रशेखर यांनी तत्पूर्वी श्री.ओमर सुलतान अल ओलामा, या यूएईच्या कृत्रिम बुद्धिमत्ता,डिजिटल अर्थव्यवस्था आणि दूरस्थ कार्यपद्धती या विभागांच्या मंत्र्यासोबत एक बैठक झाली. चंद्रशेखर यांनी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या न्यू इंडियाच्या दृष्टीकोन बद्दल अवगत केले आणि दोन्ही देशांमधील विशेष करून सखोल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता,इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर्स या क्षेत्रातील सहकार्याच्या शक्यतांवर चर्चा केली.
यूएई तील इंडियन पीपल्स फोरम उत्तर प्रदेश कौन्सिल यांनी आयोजित केलेल्या दीपोत्सव 2022 या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी चंद्रशेखर मंत्री यूएईतील अजमान,येथे रवाना झाले.
***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1874117)
Visitor Counter : 167