पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव कॉप 27 मध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व  करणार

Posted On: 04 NOV 2022 3:25PM by PIB Mumbai

 

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हे 6 ते 18 नोव्हेंबर 2022 दरम्यान इजिप्तमधील शर्म अल-शेख, येथे होणाऱ्या यूएनएफसीसीसी अर्थात हवामान बदलविषयक संयुक्त राष्ट्र आराखडा परिषदेच्या सदस्य देशांच्या  (कॉप 27) 27 व्या सत्रात  सहभागी होणाऱ्या  भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत.

भारत या प्रक्रियेत पूर्णपणे व्यस्त असून कॉप 27 मध्ये ठोस परिणामांसाठी इजिप्त सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देत आहे.

बॉनमध्ये जून 2022 मध्ये झालेल्या सहाय्यक संस्थांच्या 56 व्या सत्रात  विकसनशील देशांनी हे स्पष्ट केले की यूएनएफसीसीसी हे हवामान बदलाच्या मुद्द्यावर सामूहिक आणि बहुपक्षीय प्रतिसादाचे केंद्र आहे. परिषद  आणि पॅरिस कराराची त्याच्या ध्येये आणि तत्त्वांनुसार विश्वासू, संतुलित आणि सर्वसमावेशक अंमलबजावणी केली पाहिजे.

हवामान वित्तपुरवठा संबंधित चर्चेत लक्षणीय  प्रगती होईल आणि त्याची व्याख्या अधिक स्पष्ट होईल अशी भारताची अपेक्षा आहे . वित्तविषयक स्थायी समिती विविध व्याख्येवर अहवाल सादर करेल, परंतु आम्हाला आशा आहे की यावर सर्वांना आकलन होणारा विचारविनिमय होईल. या संज्ञेचा अर्थ परिषद आणि त्याच्या पॅरिस करारातील हवामान वित्तविषयक देशांनी केलेल्या वचनबद्धतेनुसार असणे आवश्यक आहे.

सर्व देशांना LiFE चळवळीत सहभागी होण्यासाठी दिलेल्या निमंत्रणावर भारताकडून पुन्हा भर दिला जाईल. पर्यावरणासाठी जीवनशैली, एक जन -समर्थक आणि ग्रह-समर्थक प्रयत्न जो जगाला दुर्लक्षित आणि अनावश्यक उपभोगापासून नैसर्गिक संसाधनांच्या जाणीवपूर्वक आणि उद्देशपूर्ण वापराकडे वळवू इच्छितो.

भारत हवामान बदलावर देशांतर्गत कृती आणि बहुपक्षीय सहकार्य या दोन्हीसाठी वचनबद्ध आहे आणि वसुंधरेचे  रक्षण करण्याच्या आवाहनाद्वारे सर्व जागतिक पर्यावरणीय समस्यांशी लढा देत राहील. परंतु जागतिक हवामानबदल देखील इशारा देते  की समानता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य हे सर्वांच्या सोबतीने यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असून  सर्वात भाग्यशाली असणाऱ्यांनी नेतृत्व करायला हवे.

***

S.Kane/V.Joshi/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1873694) Visitor Counter : 324