राष्ट्रपती कार्यालय

हिमालय, तिथले नाजूक-अलवार पर्यावरण, वनस्पती आणि प्राणी आपला अनमोल ठेवा आहेत; येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण हा वारसा जतन केला पाहिजेः राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मु


राष्ट्रपती मुर्मु यांनी मिझोराम विधानसभेच्या सदस्यांना केले मार्गदर्शन

Posted On: 04 NOV 2022 11:59AM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज (4 नोव्हेंबर, 2022) मिझोराम विधानसभेच्या सदस्यांना आयझॉलमध्ये मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्यापर्वतीय प्रदेशांमध्‍ये विकास करताना, विविध  आव्हाने येत असतात. तरीही मिझोरामने सर्व गोष्‍टींमध्‍ये  उल्लेखनीय कामगिरी केली आहे, विशेषत: मानवी विकासाच्या बाबतीत हे लक्षणीय आहे.  शिक्षण आणि आरोग्यसेवेला सुशासनाचे दुहेरी आधारस्तंभ मानून धोरणकर्ते आणि प्रशासकांनी या दोन्ही क्षेत्रांसाठी सुविधा देण्‍यावर चांगला भर दिला आहे. त्या म्हणाल्या कीअशा प्रदेशाची क्षमता ओळखण्यासाठी संपर्क यंत्रणा हा सर्वात मोठा घटक आहे. गावातील रस्ते, महामार्ग आणि पुलांचा विकास केला गेला तर  फक्त शिक्षण आणि आरोग्य सेवा उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत होते असे नाही तर आर्थिक संधी निर्माण होण्‍यासही  मदत होत असते.

राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्याहे नवीन तंत्रज्ञानाचे युग आहे.  त्याचा  वापर लोकांची सेवा करण्‍यासाठी  अधिक प्रभावीपणे केला गेला पाहिजे. आधुनिक मार्गांचा अवलंब करतानाही  आपण आपल्या मुळांना घट्टपणे धरून ठेवले पाहिजेअसा सल्ला त्यांनी दिला. त्या  म्हणाल्या कीआदिवासी बहुसंख्य राज्य म्हणून, मिझोराम आपला भूतकाळाचा धांडोळा घेवून त्या  काळातील  सर्वोत्तम शासन पद्धती शोधू शकतोआणि पूर्व-आधुनिक काळातील पद्धती समकालीन प्रणालींमध्ये पुनरुज्जीवित केल्या जाऊ शकतात.

मिझोराम विधानसभेने यावर्षी मे महिन्यात सुवर्णमहोत्सव साजरा केला हे नमूद करून  राष्ट्रपती म्हणाल्या, ‘’  या सभागृहाने लोकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रभावी साधन म्हणून वादविवादसुदृढ आणि फलदायी ठरेल अशी चर्चा आणि परस्पर आदराचे मॉडेल’  विकसित केले आहे. मिझोराम विधानसभेने एनईव्‍हीए  (राष्ट्रीय ई विधान ऍप्लिकेशन) स्वीकारून डिजिटल होण्यात अग्रणी भूमिका बजावली आहे, हे पाहून आपल्याला  आनंद झाला.’’  त्या म्हणाल्या की, मिझोराममधल्या महिला  प्रत्येक क्षेत्रात सक्षम आहेत, मग ते क्रीडा, संस्कृती किंवा व्यवसाय असो, सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे  राज्यातील सार्वजनिक क्षेत्रात विशेषत: कायदे निर्मिती करणा-या विधिमंडळात महिलांचे प्रतिनिधित्व वाढले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, मिझोराम आणि उर्वरित ईशान्येचा विकास हासुद्धा देशाला अधिक उंचीवर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. जागतिक मंचावर भारते महत्व वाढत आहे. विशेषतः नैऋत्य आशियातील शेजारी राष्ट्रांशी आमच्या संबंधांचे महत्व आमच्यासाठी खूप उच्च आहे. ऍक्ट इस्ट पॉलिसी या आमच्या धोरणात आशिया प्रशांत महासागर प्रदेशातील विस्तारित शेजारी देशांशी संबंध सुधारण्यासाठी ईशान्येवर जोर देण्यात आला आहे. एकेकाळी केवळ आर्थिक उपक्रम असलेल्या या धोरणाला सामरिक आणि सांस्कृतिक आयामही प्राप्त झाले आहेत. प्रदेशातील शेजारी देशांशी संबंध सुधारण्याच्या या प्रयत्नामुळे मिझोरामला लाभही झाला आहे आणि त्याने त्यात आपले योगदानही दिले आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, जागतिक मंचावर आमच्या वाढत्या प्रभावाबरोबरच आणखी जबाबदाऱ्याही येतात. उदाहरणार्थ, हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी  कृती करण्यात आम्ही आघाडी घेतली आहे आणि पर्यावरणाच्या नुकसानामुळे होणाऱ्या परिणामांना कसे सामोरे जायचे, याचे सर्वोत्कृष्ट मार्ग दाखवले आहेत. नवीकरणीय उर्जेच्या स्त्रोतांना प्रोत्साहन देण्याच्या आमच्या अनेकविध उपक्रमांनी जगभरातून प्रशंसा प्राप्त केली आहे. आम्ही, स्वतंत्र नागरिक, धोरणकर्ते, कायदा बनवणारे  किंवा प्रशासक म्हणून आमच्या भूतलावरील संकट आम्ही दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. भारतीय राज्यांमध्ये मिझोरामला सर्वाधिक वनांचे आच्छादन आहे आणि ते असामान्य आणि समृद्ध असे जैवविविधतेसाठी आदर्श वसतिस्थान आहे. हिमालयीन पर्वताच्या रांगा, त्याच्याभोवतीचे नाजूक सजीवसृष्टी आणि वनस्पती तसेच प्राणीसंपदा हा आमचा अमूल्य वारसा आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी आम्ही त्याचे संवर्धन केलेच पाहिजे.

***

S.Patil/S.Bedekar/U.Kulkarni/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1873691) Visitor Counter : 196