राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ईशान्य भारतात सेंद्रिय खाद्यान्न केंद्र बनण्याची क्षमता: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 02 NOV 2022 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2022

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या नागालँडच्या दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ नागालँड सरकारने आज मेजवानीने आयोजन केले होते. तसेच, त्यांनी कोहिमा इथे शिक्षण, रस्ते पायाभूत सुविधा आणि वित्तीय क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन/ पायाभरणी केली.

यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या की, पायाभूत सुविधांचा विकास हा राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा घटक ठरणार आहे. भारत सरकारचे 'अॅक्ट ईस्ट’ धोरण ईशान्य प्रदेशाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणारे आहे. आज उद्घाटन झालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते आणि पुलांमुळे या भागातील दळणवळण व्यवस्थेला नवी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नागालँडमधील चैतन्यमय युवाशक्ती प्रचंड प्रतिभावान आणि सर्जनशील आहे. 80 टक्क्यांहून अधिक साक्षरता दरासह, नागालँडमधील कुशल तरुण, पुरुष आणि स्त्रिया, इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व असलेले असून, संपूर्ण भारतात माहिती तंत्रज्ञान, आतिथ्यशीलता आणि इतर क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

युवकांच्या क्षमतांना वाव मिळावा, संधी मिळावी यासाठी, त्यांना सर्वांगीण शिक्षण देणे ही गुरुकिल्ली आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. मुली-मुलांसाठी शाळा आणि वसतिगृहे, एकलव्य मॉडेल निवासी शाळा, स्मार्ट क्लासरूम्स या प्रकल्पाशी संबंधित नवीन उपक्रम यामुळे राज्यातील शिक्षणाला आणखी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नागालँडच्या महिलांमध्ये साक्षरता दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे आणि नागालँड हे देशातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण आहे, असे सांगत, यावरून नागा समाजात महिलांना दिलेला उच्च सन्मान दिसून येतो, असे राष्ट्रपती म्हणाल्या. नागालँडच्या महिलांनी पुढे येऊन सार्वजनिक जीवनात अधिक सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. महिलांचे सक्षमीकरण झाल्यास संपूर्ण समाजाचा अधिक विकास होईल, असे त्या म्हणाल्या.

1978 च्या नागालँड ग्राम आणि आदिवासी परिषद अधिनियमाद्वारे नागालँडमध्ये स्थानिक स्वशासनाची परंपरागत पद्धत संस्थागत करण्याचा नागालँडसाठी खरोखर अभिमानास्पद आहे. असे राष्ट्रपती म्हणाल्या. आज संपूर्ण नागालँडमध्ये ग्रामपरिषद आणि ग्राम विकास मंडळे यांच्याद्वारे विकेंद्रित शासन पद्धती अमलात आणली जात आहे, असेही  त्यांनी नमूद केले.

सेवा वितरणात सुधारणा करण्याच्या दृष्टीने, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सरकार आणि विविध समुदायांमध्ये भागीदारी निर्माण करण्याच्या उद्देशाने नागालँडने सर्वप्रथम समुदायीकरणाची अभिनव संकल्पना मांडली आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

नागालँडमधील सुमारे 70 टक्के कृषीपद्धती पारंपारिक आणि सेंद्रिय आहे हे अधोरेखित करत राष्ट्रपती म्हणाल्या की ईशान्य भारतात, सेंद्रिय अन्नाची बास्केट म्हणजे केंद्र  बनण्याची क्षमता आहे.

नागालँडमधल्या चांगल्या दर्जाच्या कृषी आणि बागायती उत्पादनांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. नागा ट्री टोमॅटो, नागा काकडी आणि नागा मिर्चा या तीन कृषी उत्पादनांना जीआय टॅग मिळाली आहेत असे सांगत त्यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. राज्य सरकारने ‘नॅचरली नागालँड’ आउटलेट सुरू केल्याने स्थानिक उद्योजक, शेतकरी आणि विणकर यांना पारंपरिक हस्तकला आणि हातमाग, सुरेख नागा शाल आणि विविध प्रकारच्या सेंद्रिय उत्पादनांची विक्री करण्यासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

नागालँडमध्ये पर्यटनाच्याही विपुल संधी उपलब्ध आहेत, असे त्या म्हणाल्या. नागा आदिवासी जमाती त्यांच्या रंगबिरंगी संस्कृती आणि समृद्ध परंपरांसाठी ओळखल्या जातात, असे सांगत, आपली ‘विविधतेतून एकता’ हे तत्व त्यातून अधिक ठळक होते, असे त्या म्हणाल्या. गाणी आणि नृत्य, मेजवानी आणि उत्सव हे नागा संस्कृती आणि जीवनपद्धतीचा एक अंगभूत भाग आहेत. हॉर्नबिल फेस्टिव्हल हा राज्यातील रंगीबेरंगी आणि सुंदर संस्कृती टिपण्यासाठी आणि त्याचे प्रदर्शन करण्यासाठी एक लोकप्रिय व्यासपीठ बनले आहे.

नागालँडने विविध विकास मापदंडांवर लक्षणीय प्रगती केली आहे. त्यासाठी राष्ट्रपतींनी तिथल्या सर्व सरकारांचे आणि नागालँडच्या जनतेचे कौतुक केले. नागालँड राज्य स्थापनेला 60 वर्षे पूर्ण होत असताना, सर्वांनी अधिक समृद्ध आणि विकसित नागालँडच्या ध्येयासाठी स्वतःला झोकून दिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा-

 

 

 

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1873257) Visitor Counter : 199