वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

गुजरातमधील मोरबी येथे दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल वाणिज्य मंत्र्यांनी व्यक्त केला शोक


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंती निमित्त दिली एकतेची प्रतिज्ञा

Posted On: 31 OCT 2022 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2022

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी गुजरातमधील मोरबी येथे काल पूल कोसळून झालेल्या  दुर्घटनेतील जीवित हानीबद्दल  शोक व्यक्त केला. आज नवी दिल्ली येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४७व्या जयंतीनिमित्त आयोजित 'रन फॉर युनिटी'ला हिरवा झेंडा दाखविण्यापूर्वी ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.

या काय्रक्रमाआधी  पीयूष गोयल यांनी  ट्विट केले होते की, ज्या लोकांना या  आपत्तीमध्ये आपल्या  प्रियजनांना  गमावावे लागले, त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो.

गोयल यांनी वाणिज्य  भवनाच्या प्रांगणातून निघालेल्या ‘एकता दौड ’ला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.

गोयल यांनी  वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'राष्ट्रीय एकता दिवस प्रतिज्ञा' दिली. यानंतर त्यांनी वाणिज्य भवनाच्या प्रांगणातून ‘एकता दौड ’ला हिरवा झेंडा दाखवला.

550 पेक्षा अधिक संस्थानांचे एकत्रीकरण करून आधुनिक भारताची निर्मिती  करणाऱ्या  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पीयूष गोयल यांनी पुष्पहार अर्पण केला. रन फॉर युनिटी कार्यक्रमात सहभागी झाले आणि 'एक भारत, श्रेष्ठ भारत' हे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा दृढ संकल्प केला.

 

 

 

* * *

S.Kane/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1872369) Visitor Counter : 156