शिक्षण मंत्रालय
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त दिल्ली विद्यापीठाच्या एकता दौडचे धर्मेंद्र प्रधान नेतृत्व करणार
Posted On:
30 OCT 2022 8:06PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान, राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त आयोजीत दिल्ली विद्यापीठाच्या एकता दौडचे नेतृत्व करतील. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. योगेश सिंग यांच्यासह कुलसचिव, प्राचार्य, शिक्षक, वरिष्ठ अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी आणि सीबीएसईच्या (CBSE) शाळा, केंद्रीय विद्यालय आणि विद्यापीठाचे विद्यार्थीही या एकता दौडमध्ये सहभागी होणार आहेत.
भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या वतीने 31 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रीय एकता दिवस( National Unity Day) साजरा केला जाणार आहे.
या सोहळ्या निमित्ताने, व्हाइस रीगल लॉजजवळच्या गांधी पुतळ्याजवळ राष्ट्रीय एकता दिवस प्रतिज्ञा सोहळा होईल तसेच यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे भाषण देखील होईल. या मातीच्या सर्वात आदरणीय सुपुत्रांपैकी एक असलेल्या सरदार पटेल स्मरणार्थ आणि त्यांच्या जीवन कार्यातून काही शिकता यावं, याउद्देशाने व्हाइस रीगल लॉज येथील जवाहर पार्क इथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित विशेष प्रदर्शनी भरवली जाईल.
***
R.Aghor/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1872069)
Visitor Counter : 227