गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

परिवर्तन घडवणारी अनोखी दिवाळी -शालेय मुलांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम


उगमस्थानीच  कचरा वर्गीकरणासाठी  3 आठवड्यांच्या या मोहिमेमध्ये 75 लाख मुले सहभागी

Posted On: 30 OCT 2022 1:39PM by PIB Mumbai

 

भारतातील अनेक शहरांसाठी ही दिवाळी वेगळी होती.दिवाळीच्या दिवसात नेहमी ऐकू येणार्‍या फटाक्यांच्या आवाजाची जागा ‘हमें गर्व  है’  या गाण्याने आणि 'हरा गिला सुखा नीला या घोषणेने घेतली आणि गल्ल्या गल्ल्यांमध्ये जाऊन फिरत्या व्हॅन आणि गाड्या ,हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दोन कचरापेटयांसह घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेला कचरा गोळा करत होत्या.

कचरामुक्त शहरांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ,गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सुरु केलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून ,ओला आणि सुक्या कचऱ्याचे स्त्रोताच्या ठिकाणीच वर्गीकरण  करण्याबाबत सुरु करण्यात आलेल्या या मोठ्या  प्रमाणातील जनजागृती मोहिमेत भारतभरातील सुमारे 45,000 शाळांमधील 75 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग  घेतला.याव्यतिरिक्त, शहराच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका यांच्या नेतृत्वाखालील राबवण्यात आलेल्या या मोहिमेत  नागरिक, समुदाय गट आणि संस्थांनी  उत्साहाने सहभाग घेतला.

“स्वच्छता के दो रंग” (स्वच्छतेचे दोन रंग), “हरा गिला  सुखा नीला” (ओल्या कचऱ्यासाठी हिरवा डबा आणि सुक्या कचऱ्यासाठी निळा डबा) असे या मोहिमेचे नाव असून, कचऱ्याच्या उगमस्थानाच्याच  ठिकाणी कचऱ्याचे किमान दोन डब्यांमध्येवर्गीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियान राबवलेली , 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 3500 हून अधिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी  (युएलबी ) शाळा, समुदायांसह घरोघरी जाऊन तळागाळापर्यंत कचऱ्याच्या स्त्रोताच्याच  ठिकाणी ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत जनजागृती करणारे कार्यक्रम राबवले. विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी  चित्रकला, कला आणि हस्तकला यासारख्या विशेष उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेत हिरवी लेबल (ओल्या कचऱ्यासाठी) आणि निळी लेबल (सुक्या कचऱ्यासाठी) तयार केली. विद्यार्थ्यांनी कचऱ्यापासून कचऱ्याचे डबे , खेळणी तयार केली तसेच पथनाट्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहोचवला.

उगमस्थानीच  कचरा वर्गीकरणाच्या  देशव्यापी मोहिमेने स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी टाकण्यात येणारा  कचरा कमी करण्यासाठी प्रत्यक्ष कृतीद्वारे केंद्रित सहभागाला प्रोत्साहन दिले.या भव्य अशा  जन चळवळीने  समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांनी त्यांच्या स्वत:च्या विशेष पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण  करण्याबाबत जनजागृती केली आणि ही मोहीम मोठ्या प्रमाणात  यशस्वी केली.शहरे कचरामुक्त करण्यासाठी राज्यांनी आपली ताकद लावल्याने  त्याचा परिणाम तळागाळात दिसून येत आहे.

***

R.Aghor/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1872007) Visitor Counter : 165