माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी विशेष अभियान 2.0 अंतर्गत दिल्लीतील केंद्रीय संचार ब्युरोच्या सूचना भवन येथील स्वच्छता मोहिमेचा घेतला आढावा
Posted On:
28 OCT 2022 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2022
केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी दि. 27 ऑक्टोबर, 2022 रोजी दिल्लीतील केंद्रीय संचार ब्युरोच्या मुख्यालयात म्हणजेच सूचना भवनमध्ये विशेष अभियान 2.0 अंतर्गत सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी एएसअँडएफए जयंत सिन्हा, आणि वरिष्ठ आर्थिक सललागार आर.के. जेना, एडीजी( प्रशासकीय) सतीश नंबूदरीपाद, आणि एडीजी (लेखा ) रंजना देव शर्मा, तसेच सूचना भवनातील इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अपूर्व चंद्रा यांनी कार्यालयाच्या वेगवेगळ्या मजल्यांची पाहणी केली. तसेच त्यांनी लेखा विभागातल्या रेकॉर्ड रूम्सची पाहणी केली. या विभागामध्ये दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून पडून असलेली जुनी देयके काढून टाकून, जुन्या नोंदी नष्ट केल्याच्या कामाची प्रगतीची अधिका-यांनी माहिती दिली. यामुळे खूप मोठी जागा मोकळी झाल्याचे सांगितले. वर्ष 2017-18च्या पूर्वीच्या सर्व नोंदी सूचीबद्ध केल्या आहेत. तसेच कालबाह्य असलेली कोणती कागदपत्रे नष्ट करायची हे निश्चित केले असल्याचे सांगून यापैकी 50 टक्क्यांपेक्षा अधिक काम याआधीच पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. आत्तापर्यंत झालेले काम आणि त्यामुळे मोकळी झालेली जागा पाहून माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी समाधान व्यक्त केले. या विशेष मोहिमेचा भाग म्हणून आयटी कचरा आणि नमुनादाखल जतन करून ठेवलेल्या वर्तमानपत्रांच्या जुन्या प्रतींचे ढिगारे काढून टाकल्यानंतर 2500 चौरस फूट जागा मोकळी होईल, अशी अपेक्षा आहे.
सचिव चंद्रा यांनी भेट दिलेल्या लेखा विभागामध्ये त्यांना बिलिंग प्रकिया समजावून सांगण्यात आली. सीबीसी अधिकारी वर्गाने स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी कौतुक केले. तसेच उर्वरित कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज असल्याचे सांगितले.
S.Kane/S.Bedekar/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1871704)
Visitor Counter : 201