रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनएचएआय इन्व्हिटने पुन्हा एकदा अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी केली

प्रविष्टि तिथि: 27 OCT 2022 11:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑक्‍टोबर 2022

 

इन्व्हिटचा राऊंड #2 निर्धारित कालमर्यादेच्या 10 टक्के कालावधीत पाच पटीने ओव्हर सबस्क्राईब झाला.

हा राऊंड खास आहे कारण 25% एनसीडी (अपरिवर्तनीय डिबेंचर) किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत.

देशातील सामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची संधी देण्याचा हा अजेंडा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी पुढे नेत आहेत.

या पर्यायासह सेवानिवृत्त नागरिक, पगारदार व्यक्ती, छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना  नवभारताच्या उभारणीत गुंतवणूक करण्याची आणि त्याच वेळी उत्तम परतावा (वार्षिक किमान 8.05%) मिळवण्याची उत्तम संधी आहे.

उद्या ऐतिहासिक दिवस आहे कारण इनव्हिट एनसीडी बीएसईमध्ये सूचिबद्ध होतील आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी घंटा वाजवून पायाभूत विकास निधीमध्ये सार्वजनिक भागीदारीची एक नवी सुरुवात करतील.

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1871416) आगंतुक पटल : 253
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Punjabi , Urdu , हिन्दी , Kannada