संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीमा रस्‍ते संघटनेकडून (बीआरओ) विशेष स्वच्छता मोहिमेमध्‍ये रस्‍ते बांधणीसाठी प्लास्टिकच्या तुकड्यांचा वापर

Posted On: 27 OCT 2022 4:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑक्‍टोबर 2022

 

सध्‍या संपूर्ण देशभरामध्‍ये विशेष स्वच्छता मोहिमेचा दुसरा टप्‍पा  राबविण्‍यात येत आहे, यामध्‍ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्‍यासाठी बीआरओ म्‍हणजेच सीमा रस्ते बांधणी संघटनेच्‍यावतीने देशामध्‍ये तसेच भूतानमध्ये डांबरी रस्ते बांधताना मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या तुकड्यांचा वापर करण्‍याचा प्रयोग केला आहे. ही एक प्रकारे  चाचणी घेतली जात आहे. बीआरओच्‍या वतीने रस्ते बांधणीत पृष्‍ठभागाचे काम करताना आणि आतल्‍या बाजूला  पुन्हा एकदा वरचा थर देण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणावर प्लास्टिकचे बारीक कापलेले तुकडे वापरण्‍यात येत आहेत.

विशेष स्वच्छता मोहितमेच्या  काळात  बीआरओने भूतानमधील  डंटक प्रकल्पामध्‍ये 4.5 किलोमीटरच्या  फुएंतन्शोलिंग ते थिंफू मार्गाच्या कामासाठी आणि वर्तक प्रकल्पामध्‍ये 2.5 किलोमीटरच्‍या बालिपारा ते वारव्‍दार – तवांग मार्गासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. अरूणाचल प्रदेशातल्‍या उदयक प्रकल्पाअंतर्गत रोइंग - कोरोनू –पाया या एक किलोमीटर रस्त्‍याच्या प्रकल्पासाठी प्लास्टिक तुकड्यांचा वापर केला आहे. तसेच मिझोराममधील पुष्‍पक प्रकल्पामध्‍ये 5.22 किलोमीटरच्या मार्गाच्‍या  पृष्‍ठभागाच्या कामासाठीही हे नवीन तंत्रज्ञान वापरण्‍यात आले. याव्‍दारे नाथियाल - संगाउ-सैहा या मार्गाचे काम करण्‍यात आले. आणि अरूणाचल प्रदेशातल्‍या अरूणक प्रकल्‍पामध्‍ये हापोली-सरली- हुरी या दोन किलोमीटर मार्गाच्‍या कामामध्‍येही प्लास्टिक तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यात आला आहे.

गेल्या वर्षभरातील विशेष मोहिमेच्या यशानंतर, 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत केंद्र सरकारने सर्व मंत्रालये/विभाग, संलग्न/अधिनस्थ कार्यालयांमध्ये स्वच्छता या विषयावर विशेष मोहीम 2.0 आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


* * *

S.Kane/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1871287) Visitor Counter : 148


Read this release in: Urdu , English , Hindi , Tamil , Telugu