उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दीपावलीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 23 OCT 2022 7:54PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दीपावलीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे -

मी आपल्या देशातील लोकांना तसेच परदेशात राहणाऱ्या भारतीयांना पावन दीपोत्सव 'दीपावलीच्या' हार्दिक शुभेच्छा देतो.

पारंपरिक हर्ष आणि उत्साहाने साजरा केला जाणारा दीपोत्सव म्हणजे, माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासह प्रभू श्रीराम यांच्या चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत झालेल्या पुनरागमनाच्या निमित्ताने साजरा केला जाणारा आनंदोत्सव आहे. वनवासाच्या काळात श्रीरामांनी ऋषीमुनींकडून ज्ञान प्राप्त केले आणि जंगलात राहणाऱ्या सामान्य लोकांना एकत्र करत वाईट शक्तींचा पराभव केला. दीपावली हे आपला परोपकारी शासनाचा आदर्श असलेल्या रामराज्याच्या आगमनाचेही द्योतक आहे. हा पर्व श्रीरामाच्या सद्गुणी जीवनावरील आपल्या विश्वासाची पुष्टी करतो. एक आदर्श राजा, आज्ञाधारक पुत्र, अजिंक्य योद्धा आणि नीतीमान जीवन म्हणून श्रीरामांनी स्थापित केलेल्या मर्यादांचे पिढ्यानपिढ्या मानवाने अनुकरण केले आहे. याच मर्यादांनी त्यांना पुरुषोत्तमराम बनवले आहे.

दीपावली ही समृद्धीची देवी माता लक्ष्मी तसेच बुद्धी आणि सौभाग्याची देवता भगवान गणेश यांच्या उपासनेचे निमित्त आहे.

दिव्यांचा हा सण आपल्या जीवनात बुद्धी, धार्मिकता, समृद्धी आणि शांती घेऊन येवो. दिव्यांचे तेज आपल्या देशात आशा, आनंद, आरोग्य आणि सौहार्द घेऊन येवो.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1870494) अभ्यागत कक्ष : 227