संरक्षण मंत्रालय
एनसीसी कॅडेट्सनी संरक्षण प्रदर्शन 2022 मध्य़े प्रथमच संरक्षणासाठी संशेौधन आणि विकास प्रक्रियेला सहाय्यकारी क्षमता दाखवणारे तंत्रज्ञानाधारित संशोघन मांडले, प्रदर्शनात मिळवली वाहवा
Posted On:
22 OCT 2022 6:10PM by PIB Mumbai
बिहार आणि झारखंड संचालनालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी गुजरात मध्ये गांधीनगर येथे भरलेल्या बाराव्या संरक्षण प्रदर्शनात प्रदर्शनकारी म्हणून भाग घेतला. त्यांनी तिथे तीन आधुनिक तंत्रज्ञानाचे नमुने मांडले होते. अशाप्रकारे प्रदर्शनात भाग घेणारी ही जगातील पहिलीच संघटित युवा संस्था आहे.
हे तीन नमुने खालील प्रमाणे होते
UAV (मनुष्यविरहित हवाई वाहन): हे कॅडेट्सनी आरेखित तसेच विकसित केलेले उपकरण आहे. हा एक प्रकारचा बहुआयामी मंच असून ते चकमक किंवा दहशतवादी हल्ला यावर अशा प्रकारच्या जमिनीवरच्या मिशनसाठी दुरस्थ नियंत्रित कॅमेऱ्याच्या मदतीने वापरता येईल. जीपीएस वापरून हे हल्ला करण्यासाठी सुद्धा वापरता येऊ शकते. ही आवृत्ती अत्यंत किफायतशीर असून ती प्रशिक्षणासाठी तसेच संरक्षणासाठी वापरता येईल. सध्या USA चे एकूण वजन एक किलोग्रॅम आहे आणि ते सुमारे 0.7 किलोग्रॅम वजन वाहून नेऊ शकते.
"मनुष्यविरहित हवाई वाहनाची सध्या विकसित केलेली आवृत्ती ही सैन्याला आणि हवाई दल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरता येऊ शकेल. याची सुधारित आवृत्ती लवकरच आम्ही विकसित करू", असे राष्ट्रीय छात्रसेना बिट्स मेस्राचा चौथ्या वर्षाच्या .यांत्रिकी अभियांत्रिकीचा विद्यार्थी UO सौम्या गर्ग याने सांगितले.
ATV (सर्व प्रकारच्या भूपृष्ठावर वापरता येण्याजोगे वाहन): कोणत्याही प्रकारच्या भूप्रदेशावर वापरता येईल अशा तऱ्हेचे वाहन डिझाईन आणि विकसित केलेले आहे. दारूगोळा पुरवठ्यासाठी अगदी शेवटच्या टप्प्यातील काही मैलांचा खडबडीत प्रदेश पार करणे या वाहनाने शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे हे नियमित गस्त घालण्यासाठी त्याचप्रमाणे 'शोध आणि विध्वंंस' अशा स्वरुपाच्या कामगिरीसाठी सुद्धा ते वापरता येऊ शकेल. यात ऑल व्हील इंडिपेंडेंस सस्पेन्शन यासारखी वैशिष्ट्ये आहेत. त्याचप्रमाणे ते सहा फुटावरून पडणे ही सहन करू शकते. ATV मध्ये पंधराशे किलोग्रॅम पर्यंतची वाहने ओढून नेण्याची क्षमता आहे.
"हे वाहन संरक्षण कामांसाठी वापरता येऊ शकेल", असे छात्रसेनेचा कॅडेट आणि बिट्स मेस्राचा चौथ्या वर्षाचा रासायनिक अभियांत्रिकीचा विद्यार्थी कॅडेट हर्ष राणा याने सांगितले.
"एटीव्ही विकसित करणाऱ्या चमूतील सहभागी म्हणून मला अत्यंत अभिमान वाटतो आणि संरक्षण प्रदर्शन 2022 मध्ये मी केलेली कामगिरी मला पुढे मागणीनुसार एटीव्ही-आधारित आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सहाय्यकारी ठरेल" असे बिट्स मेस्राचा यांत्रिकी अभियांत्रिकीचा दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी कॅडेट आदित्य कुमार यांनी सांगितले.
हातांच्या इशाऱ्यांनुसार वागणारे बॉट सॉफ्टवेअर :: हे एक दुरून नियंत्रित करता येणारे रोबोट आहे. ते सैनिकांना शत्रू चा दृष्टीला न पडू देता , लष्करी हालचालींशी संबंधित बहुविध पर्याय देऊ शकतो.
“हातांच्या इशाऱ्यानुसार चालणारा बॉट विकसित केल्याबद्दल माझे लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कडून खूप प्रशंसा झाली. लष्कराच्या आवश्यकतेनुसार सध्याचा नमुना अधिक विकसित करण्यासाठी मी खात्रीने प्रयत्न करीन त्याचप्रमाणे हे उत्पादन अधिक बाजार उपयोगी करेल असे छात्र सेनेचा कॅडेट बी आय टी मिश्राचा दुसऱ्या वर्षाचा इलेक्ट्रॉनिक्स आणि संपर्क अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेल्या जैनम नहार यांनी सांगितले
हे सर्व नमुने लष्कराच्या आणि संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बघितले. अशा महत्त्वाच्या ठिकाणी कॅडेट्स ना आपले बुद्धिमत्तेची चमक प्रदर्शित करण्याची संधी देणाऱ्या बिहार आणि झारखंड संचालनालयाच्या छात्रसेनेच्या विभागांचे त्यांनी कौतुक केले.
बी आय टी मिश्रा रांची इथे विकसित केलेली ही उत्पादने संरक्षण प्रदर्शन 2022 मध्ये मांडली होती. या सर्व कॅडेट्सचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो असे आदिवासी कल्याण मंत्रालयाचे अर्जुन मुंडा म्हणाले
छात्र सेनेच्या कॅडेट्सने संरक्षण प्रदर्शन 2022 सारख्या प्रतिष्ठित मंचावर प्रदर्शित केलेले नवोन्मेषी संशोधन हे स्वदेशी संशोधन आणि विकास यातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सहाय्यकारी ठरणाऱ्या त्यांच्या तांत्रिक क्षमतेची खात्री पटवते. छात्रसेनेने इथे लष्कर, विद्यापिठीय विद्यार्थी आणि संशोधन संस्था यांच्यांमधील एकमेव दुवा झाला आहे. असं मेजर जनरल इंद्रबालन , ADG NCC B&J. म्हणाले.
अशा प्रकारचे उपयुक्त नवोन्मेषी उत्पादन तयार करणाऱ्या आणि संरक्षण प्रदर्शन 2022 मध्ये ते मांडणाऱ्या छात्रसेनेच्या कॅडेट्सचा मला अभिमान वाटतो. मला खात्री आहे की त्यांचं हे संशोधन फक्त लष्कराची आवश्यकता भागवणारेच नाही तर किती ेक सामाजिक गरजांची पूर्तता करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे ब्राम्होसचे माजी प्रमुख व्यवस्थापकीय संचालक सुधीर के मिश्रा म्हणाले.
"विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाला इतका भव्य मंच छात्र सेनेने उपलब्ध करून दिला याचा बिट्स मेस्राला संतोष होत आहे. यामुळे कॅडेट्सना त्यांचे खास ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तसेच ते इतरांनाही अशा प्रकारचे आवड जोपासण्यासाठी तसेच आत्मविश्वास वाढण्यासाठी उपयुक्त ठरेल" असे बिट्स मेस्राच्या AICTE आयडिया लॅबचे प्रियांक कुमार यांनी सांगितले
"छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाची मी प्रशंसा करतो असेच उत्कृष्ट काम करत रहा" असे नौदलाचे प्रमुख एडमिरल आर हरी कुमार म्हणाले.
"छात्र सेनेचे कॅडेट्स अशा प्रकारचे संशोधन संरक्षण प्रदर्शनाच्या मंचावर प्रदर्शित करताना बघणे हे खरोखर अद्भूत होते", असे महावीर चक्र सन्मान प्राप्त कर्नल सोनम वांगचुक म्हणाले.
***
S.Thakur/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1870286)
Visitor Counter : 149