माहिती आणि प्रसारण मंत्रालय

53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इंडिअन पॅनोरमाअंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची घोषणा


यंदाच्या इफ्फीमध्ये 25 फिचर आणि 20 नॉन फिचर फिल्म दाखवल्या जाणार.

फिचर फिल्म वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून 'हादीनेलेंतू' या कन्नड चित्रपटाची निवड.

नॉन फिचर फिल्म वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून 'द शो मस्ट गो ऑन' या इंग्रजी चित्रपटाची निवड

धर्मवीर...मुक्काम पोस्ट ठाणे हा मुख्य प्रवाहातील आणि फ्रेम, शेर शिवराज, एकदा काय झालं हे फिचर फिल्म  तर रेखा या मराठी नॉन फिचर फिल्मचा समावेश

Posted On: 22 OCT 2022 2:46PM by PIB Mumbai

 

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) एक मुख्य घटक असलेल्या 'इंडियन पॅनोरमा'अंतर्गत दाखवल्या जाणार असलेल्या 25 फिचर फिल्म्स आणि 20 नॉन फिचर फिल्म्सची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची घोषणा इंडियन पॅनोरमाने केली आहे. गोव्यामध्ये येत्या 20 ते 28 नोव्हेंबर 2022 या काळात होत असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) हे निवडक चित्रपट दाखवले जाणार आहेत.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय चित्रपट विकास महामंडळाच्यावतीनं (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) इंडियन पॅनोरमाचं आयोजन केलं जातं. इंडियन पॅनोरमाअंतर्गत आखलेल्या नियमांमध्ये नमूद अटी आणि कार्यपद्धतीनुसार सिनेमॅटिक, थिमॅटिक आणि सौंदर्यशास्त्रीय पातळीवर उत्कृष्ट असतील अशा फिचर नॉन फिचर फिल्म्सची निवड करणे हे यामागचं उद्दिष्ट आहे.

'इंडियन पॅनोरमा' अंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची निवड संपूर्ण भारतभरतातल्या सिनेजगतातील नामवंत व्यक्तींच्या मार्फत केली जाते. यात फिचर फिल्म्ससाठी एकूण बारा सदस्य तर नॉन-फिचर फिल्म्ससाठी सहा सदस्य ज्युरी म्हणून काम पाहतात. हे सर्व ज्युरी, सदस्य आणि संबंधित अध्यक्षांच्या नेतृत्वातील निवड समिती चित्रपटांची निवड करते. आपल्या वैयक्तिक ज्ञान कौशल्याचा वापर करून, ही नामवंत व्यक्तिमत्वांची निवड समिती एकसमान योगदान देत, एकमतानं चित्रपटांची निवड करते. त्यातूनच इंडिअन पॅनोरमा अंतर्गतच्या विविध वर्गवारीत सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड केली जाते.

फिचर फिल्म्स : यंदाच्या बारा सदस्यांचा समावेश असलेल्या या फीचर फिल्म ज्युरींचं नेतृत्व, निवड समितीचे अध्यक्ष, प्रख्यात दिग्दर्शक आणि संपादक श्री विनोद गणात्रा यांनी केलं. या बारा सदस्यांमध्ये वैयक्तिक पातळीवर अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये, तसंच चित्रपटांशी संबंधित व्यवसायांमध्ये प्रतिनिधीत्व करत असलेल्या खाली दिलेल्या व्यक्तीमत्वांचा समावेश होता. महत्वाचं म्हणजे हे सगळे ज्युरी सदस्य आपल्या व्यवसायातल्या बहुविविधतेचं प्रतिनिधीत्व करणारी व्यक्तीमत्वं आहेत.

श्री. ए. कार्तिक राजा; सिनेमॅटोग्राफर / छायाचित्रणकार श्री. आनंद ज्योती; संगीतकार, लेखक आणि चित्रपट निर्मातेश्रीमती डॉ. अनुराधा सिंह; चित्रपट निर्मात्या आणि संपादकश्री. अशोक कश्यप; निर्माता, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर / छायाचित्रणकार श्री एनुमुला प्रेमराज; दिग्दर्शक आणि पटकथालेखकश्रीमती गीता एम गुरप्पा; ध्वनी संयोजिक / साऊंड इंजिनीअरश्री. इमो सिंग; निर्माता, दिग्दर्शक आणि लेखकश्री. जुगल देबाटा; निर्माता, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर / छायाचित्रणकार श्री. सैलेश दवे; निर्माताश्री. शिबू जी सुशेलान; निर्माताश्री. व्ही. एन. आदित्य; निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखकश्री. विष्णू शर्मा; लेखक आणि चित्रपट समीक्षक

53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागातल्या फिचर फिल्म या वर्गवारीकरता एकूण 354 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून 25 चित्रपटांची निवड करण्यात आली. निवडलेले हे 25 चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या बहुरंगी आणि विविधतेचे दर्शन घडवणारे चित्रपट आहेत.

इंडियन पॅनोरमा 2022 अंतर्गत फिचर फिल्मस वर्गवारीसाठी निवड झालेल्या चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे :

 

S.No.

Title of the Film

Language

Director

 

Mahananda

Bengali

Arindam Sil

 

Three of Us

Hindi

Avinash Arun Dhaware

 

The Storyteller

Hindi

Ananth Narayan Mahadevan

 

Major

Hindi

Sashi Kiran Tikka

 

Siya

Hindi

Manish Mundra

 

Dhabari Quruvi

Irula

Priyanandanan

 

Hadinelentu

Kannada

Prithvi Konanur

 

Naanu Kusuma

Kannada

Krishne  Gowda

 

Lotus Blooms

Maithili

Pratik Sharma

 

Ariyippu

Malayalam

Mahesh Narayanan

 

Saudi Vellakka CC.225/2009

Malayalam

Tharun Moorthy

 

Frame

Marathi

Vikram Patwardhan

 

Sher Shivraj

Marathi

Digpal Lanjekar

 

Ekda Kaay Zala

Marathi

Dr. Saleel Shrinivas Kulkarni

 

Pratikshya

Oriya

Anupam Patnaik

 

Kurangu Pedal

Tamil

Kamalakannan S

 

Kida

Tamil

RA.Venkat

 

Jai Bhim

Tamil

Tha. Se. Gnanavel

 

Cinema Bandi

Telugu

Kandregula Praveen

 

Kudhiram Bose

Telugu

Vidya Sagar Raju

 

Mainstream Cinema Section

 

 

The Kashmir Files

Hindi

Vivek Ranjan Agnihotri

 

RRR (Roudram Ranam Rudhiram)

Telugu

S S Rajamouli

 

Tonic

Bengali

Avijit Sen

 

Akhanda

Telugu

Boyapati Srinivasa Rao

 

Dharmveer….Mukkam Post Thane

Marathi

Pravin Vitthal Tarde

 

इंडियन पॅनोरमा 2022 च्या फिचर फिल्म्स या वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून निवडसमितीनं श्री पृथ्वी कोनानूर दिग्दर्शित 'हादीनेलेंतू' या कन्नड चित्रपटाची एकमतानं निवड केली आहे.

 

नॉन फिचर फिल्म्स

यंदाच्या सहा सदस्यांचा समावेश असलेल्या नॉन फीचर फिल्म ज्युरींचं नेतृत्व, या निवडसमीतीचे अध्यक्ष प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, लेखक आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते, श्री ओइनम डोरेन यांनी केलं. या सहा सदस्यांमध्ये वैयक्तिक पातळीवर अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये, तसंच चित्रपटांशी संबंधित व्यवसायांमध्ये प्रतिनिधीत्व करत असलेल्या खाली दिलेल्या व्यक्तीमत्वांचा समावेश होता. महत्वाचं म्हणजे हे सगळे ज्युरी सदस्य आपल्या व्यवसायातल्या बहुविविधतेचं प्रतिनिधीत्व करणारी व्यक्तीमत्वं आहेत :

श्री चंद्रशेखर ए; चित्रपट समीक्षक, पत्रकार आणि माध्यम शिक्षणतज्ञश्री हरीश भीमानी, चित्रपट निर्माते, पटकथा लेखक, निवेदक आणि, अभिनेताश्री मनीष सैनी; चित्रपट निर्माते, लेखक आणि संपादकश्री. पी. उमेश नाईक; चित्रपट निर्माते आणि पत्रकारश्री राकेश मित्तल; चित्रपट समीक्षक, पत्रकार आणि लेखकश्री संस्कार देसाई; चित्रपट निर्माते, पटकथा लेखक, शिक्षणतज्ज्ञ

53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागातअंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या नॉन फिचर फिल्म या वर्गवारीकरता एकूण 242 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून 20 चित्रपटांची निवड करण्यात आली. निवडलेल्या या 20 चित्रपटांमधून भारतातील उदयोन्मुख आणि प्रस्थापित चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या एखादा विषयाचे ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करणे, त्या त्या विषयांसाठी संशोधन करणे आणि त्याचवेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासंबंधीच्या क्षमतेचे दर्शन घडते.

इंडियन पॅनोरमा 2022 अंतर्गत नॉन फिचर फिल्म्स वर्गवारीत निवड झालेल्या चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे:

 

S.No.

Title of the Film

Language

Director

 

Pataal-Tee

Bhotiya

Mukund Narayan   &

Santosh Singh

 

Taangh

English

Bani Singh

 

Ayushman

English

Jacob Varghese

 

Other Ray: Art of Satyajit Ray

English

Jaydip Mukherjee

 

Gurujana

English

Sudipto Sen

 

Hatibondhu

English

Kripal Kalita

 

Clinton

English

Prithviraj Das Gupta

 

The Show Must Go On

English

Divya Cowasji

 

Khajuraho, Anand Aur Mukti

Hindi

Ramji Om & Deepika Kothari

 

Vibhajan Ki Vibhishka Unkahi Kahaniyan

Hindi

Hitesh Shankar

 

Fatima

Hindi

Sourabh Kanti Dutta

 

Chhu Med Na Yul Med

Hindi

Munmun Dhalaria

 

Before I Die

Hindi

Nakul Dev

 

Madhyantara

Kannada

Basti Dinesh Shenoy

 

Wagro

Konkani

Sainath S Uskaikar

 

Veetilekku

Malayalam

Akhil Dev M

 

Beyond Blast

Manipuri

Saikhom Ratan

 

Rekha

Marathi

Shekhar Bapu Rankhambe

 

Yaanam

Sanskrit

Vinod Mankara

 

Little Wings

Tamil

Naveenkumar Muthaiah

 

इंडियन पॅनोरमा 2022 च्या नॉन फिचर फिल्म्स या वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून निवडसमितीनं कुमारी दिव्या कोवासजी दिग्दर्शित 'द शो मस्ट गो ऑन' या इंग्रजी चित्रपटाची एकमतानं निवड केली आहे.

भारताच्या समृद्ध संस्कृती आणि वारशासह भारतीय चित्रपटांना चालना देण्याच्या उद्देशानं, 1978 भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गतच (इफ्फी) इंडियन पॅनोरमा हा विभाग सुरू करण्यात आला होता. त्या त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट दाखवण्यासाठी इंडियन पॅनोरमा वचनबद्ध आहे, आणि इंडियन पॅनोरमाच्या स्थापनेपासून हे काम अव्याहतपणे सुरू आहे. इंडियन पॅनोरमा विभागासाठी चित्रपट निवडीमागे चित्रपट कलेच्या प्रसाराचा मुख्य उद्देश आहे, त्यामुळेच या विभागा अंतर्गत निवडलेले चित्रपट, भारत आणि परदेशातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, द्विपक्षीय सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांच्यावेळी आयोजित भारतीय चित्रपट सप्ताहात, तसेच सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या अधिकृत चौकटीपलिकडे आयोजित होणाऱ्या भारतीय चित्रपट महोत्सव आणि भारतातील विशेष भारतीय पॅनोरमा महोत्सवांमध्ये ना-नफा तत्वावर दाखवले जातात.

***

S.Thakur/T.Pawar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1870229) Visitor Counter : 344