संरक्षण मंत्रालय

डिफेन्स एक्स्पो 2022 च्या पार्श्वभूमीवर, मनोहर पर्रीकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेत (MP-IDSA) ,भारत-आफ्रिका संरक्षण संवादसत्रात, भारत-आफ्रिका सुरक्षा छात्र वृत्ती कार्यक्रमाचं उद्घाटन

Posted On: 19 OCT 2022 9:20AM by PIB Mumbai

डिफेन्स एक्स्पो 2022 च्या पार्श्वभूमीवर, गुजरात मध्ये गांधीनगर मध्ये भारत-आफ्रिका संरक्षण संवाद सत्राचं (IADD)  काल 18 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजन करण्यात  आलं होतं. IADD च्या दुसर्‍या टप्प्याची  परिणती  म्हणून स्विकारण्यात आलेल्या गांधीनगर जाहीरनाम्यात, भारत-आफ्रिका संरक्षण आणि सुरक्षा भागीदारीचा अधिक विस्तार करण्यासाठी नवनवीन क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

IADD संवादसत्रात, गांधीनगर जाहीरनाम्याच्या नवीन प्रस्तावांच्या अनुषंगानं, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'भारत-आफ्रिका सुरक्षा छात्र वृत्ती' या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि त्याच्या माहिती पुस्तिकेचं अनावरण करुन ती, मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिस (MP-IDSA), अर्थात मनोहर पर्रीकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेच्या महासंचालकां कडे  सुपूर्द केली.

IADD चे ज्ञानक्षेत्रातले भागीदार MP-IDSA , या छात्र वृत्ती कार्यक्रमाचं आयोजन करतील.  या छात्रवृत्तीमुळे आफ्रिकी अभ्यासकांना भारतातील संरक्षण आणि सुरक्षा विषयांवर आणि समस्यांवर संशोधन करण्याची संधी मिळेल. प्रत्येकासाठी छात्रवृत्तीचा कालावधी एक ते तीन महिन्यांचा असेल आणि  MP-IDSA मध्ये त्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. विद्यार्थ्यांना यासाठी विद्यावेतन देखील मिळेल.  अर्ज प्रक्रियेचे अधिक तपशील MP-IDSA च्या, (https://www.idsa.in/) या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 

***

GopalC/AshutoshS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1869099) Visitor Counter : 143