रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सणासुदीच्या काळात प्रवाशांचा सुरळीत आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून अतिरिक्त 32 विशेष सेवा घोषित


179 विशेष सेवा यापूर्वी घोषित करण्यात आल्या असून एकूण 211 विशेष सेवेच्या 2561 फेऱ्या होणार

देशभरातील प्रमुख स्थळांना रेल्वे मार्गांशी जोडण्यासाठी विशेष गाड्या

Posted On: 18 OCT 2022 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18  ऑक्टोबर  2022

सध्या सुरू असलेल्या या सणासुदीच्या काळात, रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, भारतीय रेल्वे यावर्षी छठ पूजेपर्यंत 211 विशेष गाड्यांच्या (जोड्यांमध्ये) 2561 फेऱ्या चालवत आहे.दरभंगा, आझमगढ, सहरसा, भागलपूर, मुझफ्फरपूर, फिरोजपूर, पटणा, कटिहार आणि अमृतसर इत्यादी रेल्वे मार्गांशी देशभरातील प्रमुख स्थळांना जोडण्यासाठी विशेष गाड्यांची योजना आखण्यात आली आहे.भारतीय रेल्वेने या सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी सुरळीत आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त 32 विशेष सेवा घोषित  केल्या आहेत, तर 179 विशेष सेवा यापूर्वी घोषित  करण्यात आल्या होत्या.. (कृपया येथे पहा: https://www.pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1865093)

S.NO.

Rly.

NO. OF SPL. (in pair)

NO. OF TOTAL TRIPS

1

CR

10

132

2

ECR

10

176

3

ECOR

6

94

4

ER

14

108

5

NR

44

367

6

NCR

9

227

7

NER

3

44

8

NFR

4

64

9

NWR

7

257

10

SR

11

56

11

SER

4

22

12

SCR

35

271

13

SWR

23

386

14

WCR

7

26

15

WR

24

331

 

G.TOTAL

211

2561

आसन अडवणे , जास्तीचे भाडे वसूल करणे आणि दलाली इत्यादी  गैरप्रकारांवर काटेकोर नजर ठेवली जात आहे. अनारक्षित डब्यांमध्ये प्रवाशांचा सुव्यवस्थित प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली टर्मिनस स्थानकांवर रांगा लावून गर्दी नियंत्रणासाठी  उपाययोजना केल्या जात आहेत.

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 


(Release ID: 1869006) Visitor Counter : 185