इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तक्रार निवारण निर्देशांकात सलग दुसऱ्या महिन्यात युआयडीएआय अव्वल स्थानी

Posted On: 18 OCT 2022 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18  ऑक्टोबर  2022

 

सार्वजनिक तक्रार निवारणात, युआयडीएआय, म्हणजेच भारतीय एकल ओळख प्राधिकरण  सलग दुसऱ्या महिन्यात अव्वल स्थानी कायम आहे. अ श्रेणीची सर्व मंत्रालये, विभाग आणि स्वायत्त संस्थांमध्ये युआयडीएआयने प्रथम स्थान कायम राखल्याचे, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाने प्रसिद्ध केलेल्या. सप्टेंबर 2022 साठीच्या क्रमवारीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. युआयडीएआयने सलग दुसऱ्या महिन्यात हे स्थान कायम राखले आहे.

सीपीजीआरएएमएस च्या माध्यमातून सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यात, तसेच आधार क्रमांक धारकांना उत्तम प्रशासकीय अनुभव देण्यात युआयडीएआयची कामगिरी सरस ठरली आहे.

युआयडीएआयचे मुख्यालय, त्यांची प्रादेशिक कार्यालये, तंत्रज्ञान केंद्र आणि करारबद्ध भागीदार अशा सर्व स्तरावर, त्यांनी एक उत्तम तक्रार निवारण यंत्रणा उभी केली आहे. अशा या ग्राहकानुकूल व्यवस्थेमुळे युआयडीएआयला ग्राहकांच्या 92 टक्के तक्रारींचे एका आठवड्यात निवारण करणे शक्य होते.

या संस्थेमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान अधिक  सुलभ होत आहे तसेच संस्थेची तक्रार निवारण यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी यूआयडीएआय प्रयत्नरत आहे. आपल्या कार्यपद्धतीत UIDAI हळूहळू अत्याधुनिक ओपन-सोर्स सोल्यूशन आणत आहे. नवीन ग्राहक संबंध व्यवस्थापन  विषयक  समस्या निवारण, नागरिकांना आधारसाठी  अत्याधुनिक सेवा मिळण्यास हातभार लावणारे आहे.

नव्या सीआरएम समस्यानिवारण व्यवस्थेत बहु संपर्क व्यवस्थेची- म्हणजे, दूरध्वनी, ईमेल, चॅटबॉट, वेब पोर्टल, सोशल मीडिया, पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष येऊन, तक्रार दाखल करणे, त्याचा मागोवा घेणे आणि त्याचे प्रभावीपणे निवारण करणे अशा सर्व सुविधांचा समावेश आहे.

देशातील 12 प्रादेशिक भाषांमध्ये फोन आणि आयव्हीआरएस सेवा आता देशभर सुरु झाल्या आहेत. यामुळे नागरिकांना, आयव्हीआरएस वर आधार नोंदणी/अद्ययावत स्थिती तपासणे, आधार पीव्हीसी कार्ड स्थितीचा मागोवा घेणे, नावनोंदणी केंद्राच्या स्थानाची माहिती अशा सुविधा मिळू शकतील.

त्याशिवाय, इतर सुविधाही लवकरच प्रादेशिक भाषांमध्ये देशभरात सुरु होतील. नागरिकांची सेवा करण्यास कटिबद्ध असलेले युआयडीएआय, लोकांचे जीवनमान सुखकर करणे आणि उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे यासाठी आवश्यक त्या सुविधा देत आहे.

 

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1868991) Visitor Counter : 241


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu