रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
मध्य प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग 75ई वरील रेवा-सिद्धी विभागातील दुहेरी बोगद्यांसह चूरहाट बायपासचे काम पूर्ण होत आले आहे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
दुहेरी बोगद्यांमुळे त्या भागातील जंगलामध्ये वन्यजीवांच्या संचारात कोणताही अडथळा येणार नाही : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Posted On:
18 OCT 2022 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2022
मध्य प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग 75 ई वरील रेवा-सिद्धी विभागातील दुहेरी बोगद्यांसह चूरहाट बायपासचे काम पूर्ण होत आले आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट संदेशांच्या मालिकेद्वारे दिली आहे.
शाश्वत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत तसेच मानवजात, निसर्ग आणि वन्यजीव यांचे सुसंवादात्मक सहअस्तित्व सुनिश्चित करण्याचा हेतू साध्य करत, या बायपासमध्ये असलेले दुहेरी बोगदे त्या भागातील जंगलामध्ये वन्यजीवांच्या संचारात कोणताही अडथळा येणार नाही याची हमी देतात.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, वाहतुकीचे वेगळ्या प्रकारे मार्गीकरण केल्यामुळे, ‘मोहन' नावाचा पांढरा वाघ ज्या भागात निवास करत होता तेथील नैसर्गिक अधिवासाची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. या रस्त्यावर योग्य प्रमाणात निर्मित अंडरपासमुळे रस्त्यावरील अपघाताच्या शक्यता कमी होतील आणि रस्ते सुरक्षेची सुनिश्चिती होईल असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की,बोगद्यांच्या उभारणीमुळे मोहनिया घाटापाशी होणारी वाहतुकीची कोंडी टळेल आणि या भागातून सुकरतेने प्रवास करता येईल.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, दुहेरी बोगद्यांच्या उभारणीमुळे रेवा आणि सिद्धी या ठिकाणांमधील अंतर सुमारे 7 किलोमीटरने कमी झाले आहे आणि या कामातील आधुनिक भौमितिक रचनेमुळे या प्रवासाच्या वेळेत देखील 45 मिनिटांची बचत होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, शाश्वततेसह नव्या भारताचा कायापालट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील आमच्या उत्तम प्रशासनाच्या उत्कृष्टतेचा निदर्शक आहे.

G.Chippalkatti/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1868845)
Visitor Counter : 213