कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

कोळसा खाण लिलाव आणि उत्पादनात खाजगी क्षेत्राशी स्पर्धा करण्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे सार्वजनिक उपक्रमांना आवाहन


दिल्लीत राष्ट्रीय कोळसा परिषद आणि प्रदर्शन-2022 चे उद्घाटन

Posted On: 17 OCT 2022 5:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑक्‍टोबर 2022

 

सार्वजनिक उपक्रमांनी (पीएसयू) कोळसा खाण लिलाव आणि उत्पादनात खाजगी क्षेत्राशी स्पर्धा करावी असे आवाहन केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये अभूतपूर्व वाढ होऊनही, कोल इंडिया लिमिटेडने (सीआयएल) देशांतर्गत कोळशाच्या किमतीत वाढ केली नाही. कोळशाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ केली आणि नजीकच्या काळात औष्णिक उर्जा प्रकल्पांना भेडसावणाऱ्या कोळसा टंचाईवर मात करण्यात यश मिळवले असे त्यांनी आज राष्ट्रीय कोळसा परिषद आणि प्रदर्शन-2022 ला संबोधित करताना, निदर्शनास आणले.

2020 मध्ये सुरू केलेल्या व्यावसायिक लिलावाअंतर्गत आतापर्यंत 64 कोळसा खाणींचा यशस्वीपणे लिलाव झाला आहे.  2024 पर्यंत औष्णिक कोळशाची आयात थांबवण्यासाठी सर्व प्रयत्न जोरात सुरू आहेत आणि कोळशाच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. सीआयएलची कामगिरी लक्षणीय आहे. यावर्षी बंदिस्त (कॅप्टिव्ह ) खाणींमधून 125 दशलक्ष टन (एमटी) कोळसा तयार होण्याची शक्यता आहे असे जोशी यांनी सांगितले.

कोळसा मंत्रालयाने परिषदे दरम्यान, कोळसा खाणींच्या 10 यशस्वी बोलीदारांसोबत 15व्या टप्प्यातील कोळशाच्या विक्रीसाठी आणि 13व्या आणि 14व्या टप्प्याच्या दुसऱ्या प्रयत्नांतर्गत करार केले आहेत.

या 10 कोळसा खाणींमधून सर्वोत्तम क्षमतेने प्रतिवर्षी 10.39 दशलक्ष टन उत्पादनाचा विचार करता 1077.67 कोटी रुपये इतकी  एकूण वार्षिक महसूल निर्मिती अंदाजित आहे.

* * *

S.Kane/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1868536) Visitor Counter : 184


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil