संरक्षण मंत्रालय

गुजरातमधील गांधीनगर येथे18 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संरक्षण एक्स्पो दरम्यान भारत-आफ्रिका यांच्यात होणार संरक्षण विषयक संवाद.

Posted On: 16 OCT 2022 10:09AM by PIB Mumbai

 संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे येत्या 18 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे 12 व्या संरक्षण एक्सपोच्या वेळी  होणाऱ्या भारत-आफ्रिका संरक्षण संवाद (IADD) दरम्यान आफ्रिकन राष्ट्रांच्या संरक्षणमंत्र्यांच्या परीषदेचे यजमानपद भूषवणार आहेत.'भारत-आफ्रिका: संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यासाठी समन्वय आणि बळकटीकरणासाठी धोरणाचा स्वीकार' अशी या संवादाची व्यापक संकल्पना आहे.

 भारत आणि आफ्रिका यांच्यात घनिष्ठ आणि ऐतिहासिक ऋणानुबंध आहेत. आफ्रिकेकडे  पहाण्याचा भारताचा दृष्टीकोन 2018 मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या कंपाला मार्गदर्शक तत्त्वांवर आधारीत आहे. भारताची आफ्रिकेबाबतची प्रतिबद्धता आफ्रिकन लोकांनी स्वतः घालून दिलेल्या प्राधान्यक्रमावर अवलंबून आहे. 

दिनांक 06 फेब्रुवारी 2020 रोजी उत्तर प्रदेश येथील लखनौमधे  झालेल्या संरक्षण एक्स्पोमधे प्रथम, अशाप्रकारची भारत-आफ्रिका संरक्षणमंत्री परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी एक संयुक्त घोषणापत्र - ‘लखनौ घोषणापत्र’ - यानावाने एक जाहीरनामा या परीषदेच्या अखेरीस प्रसिद्ध करण्यात आला  होता.

याच ‘लखनौ घोषणापत्राच्या पुढे जात आणि भागधारकांशी सल्लामसलत करून, संरक्षण एक्स्पो दरम्यान दर दोन वर्षांनी ही बैठक (IAAD) आयोजित करण्यात येणार आहे.क्षमता विकास, प्रशिक्षण, सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि दहशतवादाचा प्रतिकार यासारख्या क्षेत्रांसह,आयएडीडी (IADD) परस्परांच्या सहयोगाने कार्यान्वित करण्याच्या नवनवीन क्षेत्रांचा शोध घेईल.

 मनोहर पर्रीकर इन्स्टिटय़ूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ॲनॅलिसिस (MP-IDSA) ही संस्था भारत-आफ्रिका संरक्षण संवादासाठी माहिती आदानप्रदान करण्यासाठी सहयोगी संस्था म्हणून कार्य करेल. 

***

Ankush C/Sampada P/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1868217) Visitor Counter : 151