विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) संस्थेची बैठक
ग्रामीण भारतामध्ये रोजगार निर्मितीसाठी आणि उत्पन्नाचा स्तर वाढवण्यासाठी सीएसआयआरचे संशोधन प्रयत्न आता प्रामुख्याने हरित ऊर्जा तंत्रज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष हस्तक्षेप यावर केंद्रित : डॉ जितेंद्र सिंह
प्रविष्टि तिथि:
14 OCT 2022 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सकाळी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर ) संस्थेची बैठक होणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर )संस्थेच्या सर्व सदस्यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
XJ77.jpg)
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद ही विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे आणि पंतप्रधान हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
या बैठकीला सीएसआयआरचे उपाध्यक्ष म्हणून केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्यासह केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल देखील उपस्थित राहणार आहेत.सीएसआयआर संस्थेमध्ये प्रख्यात शास्त्रज्ञ, उद्योजक आणि वैज्ञानिक मंत्रालयांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.सीएसआयआरच्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील कार्यक्रमांबाबत विचारमंथन करण्यासाठी या संस्थेची दरवर्षी बैठक होते.
30SN.jpg)
ग्रामीण भारतामध्ये रोजगार निर्मितेसाठी आणि उत्पन्नाचा स्तर वाढवण्यासाठी सीएसआयआरचे संशोधन प्रयत्न आता प्रामुख्याने हरित ऊर्जा तंत्रज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष हस्तक्षेप यावर केंद्रित आहेत , असे डॉ जितेंद्र सिंह यांनी सीएसआयआर संस्थेच्या बैठकीबद्दल आणि सीएसआयआरच्या कामगिरीबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले.
सीएसआयआर दृष्टीकोन 2030 नुसार आणि राष्ट्रीय दृष्टिकोन @2047 नुसार सीएसआयआरमध्ये नवचैतन्य निर्माण करून भारताला एक वैज्ञानिक ऊर्जाकेंद्र बनविण्यासाठी आणि देशासाठी तंत्रज्ञान प्रदाता बनून आत्मनिर्भर बनवण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
S.Kulkarni/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1867863)
आगंतुक पटल : 212