रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
एनएचआयडीसीएलने आयआयटी पटना सोबत केला सामंजस्य करार
Posted On:
14 OCT 2022 11:28AM by PIB Mumbai
भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एनएचआयडीसीएल) 2022-23 मध्ये सीएसआयआर -केंद्रीय रस्ते संशोधन संस्था ,आयआयटी रुडकी , आयआयटी कानपूर आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
यापूर्वी एनएचआयडीसीएलच्या मुख्य अभियांत्रिकी व्यावसायिकांचे कौशल्य आणि क्षमता सुधारण्याच्या अनुषंगाने , महामार्ग अभियांत्रिकी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान सामायिक करण्यासाठी आयआयटी मुंबई आणि आयआयटी गुवाहाटी यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला होता.एनएचआयडीसीएल ईशान्य प्रदेश, लद्दाख केंद्रशासित प्रदेश , जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र शासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये अत्यंत कठीण भौगोलिक भागात महामार्ग, बोगदे आणि इतर पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी अथक परिश्रम घेत आहे.


एनएचआयडीसीएलने सामंजस्य करार करण्यासाठी अन्य आयआयटी, एनआयटी यांच्याशीही चर्चा सुरू केली आहे.
हा पुढाकार एनएचआयडीसीएला नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणण्यात मदत करेल आणि आव्हानात्मक डोंगराळ आणि सीमावर्ती भागात महामार्ग बांधकाम समस्यांवर व्यावहारिक उपाय शोधण्यात सहाय्य करेल. आयआयटी पटनासह सामंजस्य करारावर अलीकडेच 11 ऑक्टोबर 2022 रोजी स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य करारावर आयआयटी पटनाचे संचालक डॉ. (प्रा.) टीएन सिंह आणि आणि एनएचआयडीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक चंचल कुमार यांनी स्वाक्षरी केली.
***
Gopal C/Sonal/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1867647)
Visitor Counter : 247