आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त टेली मेंटल हेल्थ असिस्टंट अँड नेटवर्किंग अॅक्रॉस स्टेट्स (टेली-मानस) उपक्रमाची सुरुवात
Posted On:
10 OCT 2022 5:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2022
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात एक नवीन मैलाचा दगड प्रस्थापित करत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या टेली मेंटल हेल्थ असिस्टन्स अँड नेटवर्किंग अॅक्रॉस स्टेट्स (टेली-मानस) या उपक्रमाची सुरुवात बंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस (निम्हन्स) मध्ये आज कर्नाटकचे राज्यपाल, थावरचंद गहलोत यांनी आभासी माध्यमातून केली.
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याचे महत्व आणि महामारीमुळे वाढलेल्या आव्हानांना तोंड देणारे डिजिटल मानसिक आरोग्य नेटवर्क स्थापन करण्याची तातडीची गरज ओळखून, भारत सरकारने 2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम (NTMHP) जाहीर केला. टेली -मानस चे उद्दिष्ट संपूर्ण देशभरात चोवीस तास मोफत टेली-मानसिक आरोग्य सेवा प्रदान करणे, विशेषत: दुर्गम किंवा कमी सेवा असलेल्या भागातील लोकांना सेवा पुरवणे हे आहे. कार्यक्रमात 23 उत्कृष्ट टेली-मानसिक आरोग्य केंद्रांचे नेटवर्क समाविष्ट आहे, ज्यामध्ये निम्हन्स हे नोडल केंद्र आहे आणि बंगलोर ची आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIITB) तंत्रज्ञान सहाय्य प्रदान करते. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बेंगळुरू आणि राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र (NHRSC) तांत्रिक सहाय्य प्रदान करतील.
प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशात किमान एक टेली-मानस कक्ष उघडण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.
देशभरात 24/7 सेवा देणारा एक टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक (14416) सुरू करण्यात आला असून त्यात सेवांचा लाभ घेण्यासाठी ग्राहक त्यांच्या पसंतीची भाषा निवडू शकतात. हे दूरध्वनी संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील टेली -मानस कक्षाकडे वळवले जातील.
* * *
S.Kane/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1866521)
Visitor Counter : 436