अंतराळ विभाग
भारतीय अंतराळ स्टार्ट-अप्स लवकरच सॅटेलाईट कॉन्स्टिलेशन्सचे प्रक्षेपण आणि नव्या प्रक्षेपकाच्या प्रयत्नांद्वारे मैलाचा टप्पा साध्य करतील - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
10 OCT 2022 4:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2022
भारतीय अंतराळ स्टार्ट-अप्स लवकरच सॅटेलाईट कॉन्स्टिलेशन्सचे (एक प्रणाली म्हणून एकत्रितपणे कार्यरत असलेल्या कृत्रिम उपग्रहांचा गट) प्रक्षेपण आणि नव्या प्रक्षेपकाच्या प्रयत्नांद्वारे मैलाचा टप्पा साध्य करतील, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान,पंतप्रधान कार्यालय व अंतराळ आणि अणुऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
एल अँड टी आणि एचएएलद्वारे पाच पीएसएलव्ही देशांतर्गत तयार केली जात आहेत, तर इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि एनएसआयएल अर्थात न्यू स्पेस इंडिया लिमिटेड यांच्या माध्यमातून 'वनवेब' आपल्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी सज्ज आहे,अशी माहितीही त्यांनी दिली.
इंडियन स्पेस असोसिएशनच्या (ISpA) पहिल्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे आयोजित इंडिया स्पेस कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते. खाजगी उद्योगांसाठी अंतराळ क्षेत्र खुले करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2020 मध्ये घेतलेला निर्णय क्रांतिकारी आणि नवी दिशा देणारा ठरला असून त्यामुळे देशाच्या अंतराळ परिसंस्थेचे स्वरूप बदलले आहे,असे ते म्हणाले
आमच्या तरुण आणि खाजगी उद्योगांची ताकद आणि नाविन्यपूर्ण क्षमता आगामी काळात जागतिक अंतराळ तंत्रज्ञानाच्या बदलांमध्ये अग्रणी ठरेल,असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातले युवा प्रतिभावंत अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील नवे अडसर पार करतील. अंतराळ क्षेत्रातील अगणित संधी घेण्यासाठी ते सज्ज आहेत, असे सिंह म्हणाले.
इस्रोच्या कामगिरीने आपल्याला जागतिक मान्यता आणि प्रशंसा दोन्ही मिळवून दिली असल्याचे सिंह यांनी आपल्या भाषणाच्या समारोपात सांगितले. जगातील सर्वात मोठ्या रिमोट सेन्सिंग सॅटेलाईटस कॉन्स्टेलेशनसोबत अंतराळ क्षेत्रात इस्रो एक विशेष स्थान निर्माण करत आहे,हे एखाद्या सन्मानापेक्षा कमी नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आपल्या यशाने इस्रो कायमच भारताचा गौरव वृद्धिंगत करेल, असे त्यांनी अधोरेखित केले.
* * *
S.Kane/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1866512)
Visitor Counter : 241