अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 11 ते 16 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी -जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आज सायंकाळी अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार
Posted On:
10 OCT 2022 3:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2022
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन 11 ऑक्टोबर 2022 पासून अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान, सीतारामन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), जागतिक बँक, जी-20 मधील वित्तमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर्सच्या (FMCBG) च्या वार्षिक बैठकींना उपस्थित राहणार आहेत.
अर्थमंत्री जपान, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, भूतान, न्यूझीलंड, इजिप्त, जर्मनी, मॉरिशस, यूएई, इराण आणि नेदरलँडसह अनेक देशांसोबत द्विपक्षीय बैठकांमध्ये सहभागी होतील. आर्थिक सहयोग आणि विकास संघटनेचे नेते (OECD), युरोपियन आयोग आणि संयुक्त राष्ट्र विकास संघटनेचे (UNDP) नेते आणि प्रमुख यांच्याशीही अर्थमंत्री स्वतंत्रपणे बैठका घेतील.
याशिवाय अर्थमंत्री सीतारमण अमेरिकेच्या कोषागार सचिव जेनेट येलन आणि जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांच्या सोबत परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीत, सहभागी होतील.
केंद्रीय अर्थमंत्री वॉशिंग्टन, डीसी येथील ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशन येथे "भारतातील आर्थिक संधी आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील भूमिका" या विषयावर भाषण देतील.
* * *
S.Kane/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1866481)