अर्थ मंत्रालय
आर्थिक वर्ष 2022-23 मधील दिनांक 08.10.2022 पर्यंतचे प्रत्यक्ष कर संकलन
Posted On:
09 OCT 2022 12:52PM by PIB Mumbai
दिनांक 8 ऑक्टोबर 2022 पर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाचे तात्पुरते आकडे स्थिर वाढ नोंदवत आहेत.
दिनांक 8 ऑक्टोबर 2022 पर्यंतचे प्रत्यक्ष कर संकलन हे दर्शविते की, एकूण संकलन रु. 8.98 लाख कोटी झाले जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण संकलनापेक्षा 23.8% जास्त आहे. प्रत्यक्ष कर संकलन, परताव्याचे निव्वळ, 7.45 लाख कोटी रुपये जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा 16.3% जास्त आहे. हे कर संकलन आर्थिक वर्ष 2022-23 साठीच्या प्रत्यक्ष करांच्या एकूण अंदाजपत्रकाच्या 52.46% आहे.
एकूण महसूल संकलनाच्या दृष्टीने कॉर्पोरेट आयकर (CIT) आणि वैयक्तिक आयकर (PIT) चा वाढीचा दर 16.73% आहे, तर PIT (STT सह) साठी 32.30% आहे. परताव्याच्या समायोजनानंतर, CIT संकलनातील निव्वळ वाढ 16.29% आहे आणि PIT संकलनात 17.35% (केवळ PIT)/16.25% (STT सह PIT) झालेली आहे.
दिनांक 1 एप्रिल 2022 ते दिनांक 8 ऑक्टोबर 2022 या कालावधीत रु. 1.53 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे, जो मागील वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यांच्या तुलनेत 81.0% जास्त आहे.
***
M.Jaybhaye/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1866212)
Visitor Counter : 240