गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आसाममध्ये गुवाहाटी येथे ईशान्येकडील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव तसेच पोलीस महासंचालकांची ‘अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावरील बैठक

Posted On: 08 OCT 2022 9:02PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली 08 ऑक्टोबर 2022

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज आसाममध्ये गुवाहाटी येथे ईशान्येकडील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव तसेच पोलीस महासंचालकांची अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षाया विषयावरील बैठक पार पडली. ईशान्य प्रदेशातील अंमली पदार्थविषयक समस्या आणि त्यावर नियंत्रण मिळविण्याचे मार्ग याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. केंद्रीय गृह सचिव, अंमली पदार्थ नियंत्रण मंडळाचे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001RR8Y.jpg

या बैठकीत बोलताना, केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढणे हे कोणत्याही समाजासाठी जीवघेणेच असते. एखाद्या दहशतवादी हल्ल्यामुळे होणारे नुकसान मर्यादित असते पण अंमली पदार्थांचा समाजातील प्रसार अनेक पिढ्यांसाठी मारक ठरतो.ते म्हणाले की अंमली पदार्थ एखाद्या वाळवीसारखे आपल्या समाजाच्या आणि देशाच्या युवाशक्तीला पोखरून खिळखिळे करून टाकतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अंमली पदार्थ-मुक्त भारताचे स्वप्न साकार करण्याचा दृढ निश्चय केला आहे असे ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने अमली पदार्थ तस्करी तसेच संघटीत गुन्हेगारांच्या काळ्या पैशाच्या वापरातून देशाची अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा यांना धोक्यात आणण्यासाठी केला जाणारा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडण्यासाठी झिरो टॉलरन्सचे धोरण स्वीकारले आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002HWPQ.jpg

केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले की, आपल्या देशाच्या ईशान्य भागाला चार देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा भिडलेल्या आहेत तसेच हा भाग म्यानमारच्या अधिक नजीक आहे आणि म्यानमार हा अफगाणिस्तानच्या खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा अफू उत्पादक देश आहे. ईशान्य भारतात अंमली पदार्थांचे सेवन ही अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या मॅग्निटयूड ऑफ सबस्टन्स अहवाल 2019 नुसार देशाच्या ईशान्येकडील सात राज्यांमध्ये अफू तसेच गांजा सेवनाचे प्रमाण धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचले असून देशाच्या इतर भागातील या पदार्थांच्या सरासरी सेवनाच्या प्रमाणापेक्षा ते कितीतरी अधिक आहे. अलीकडच्या काळात ईशान्य भारतात यासंदर्भात काही नवीन प्रकार सुरु झाल्याचे निदर्शनास आले आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, अंमली पदार्थांच्या व्यवहारात सक्रीय असलेले गट आता तस्करीसाठी ईशान्य भारतातील बँक खाती आणि रहिवासाच्या पत्त्यांचा अवैध वापर करू लागले आहेत. ईशान्येकडील भागातील अंमली पदार्थांच्या तस्करांनी नायजेरियाच्या नागरिकांशी देखील हातमिळवणी केल्याचे दिसून आले आहे. देशाच्या ईशान्य भागात राहणाऱ्या काही दक्षिण आशियाई लोकांचा अंमली पदार्थ तस्करीमध्ये सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे असे शहा यांनी सांगितले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003L7QF.jpg

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनुसार, केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने या भागातील अंमली पदार्थांची समस्या सोडविण्यासाठी तेथील संस्थात्मक रचना मजबूत करणे, अंमली पदार्थ नियंत्रणासाठी कार्यरत असणाऱ्या सर्व संस्थांमध्ये समन्वय निर्माण करून त्यांचे सशक्तीकरण करणे आणि अंमली पदार्थांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान हाती घेणे अशा त्रिसूत्रीचा स्वीकार केला आहे. आधीच्या काळात ईशान्य भागात अंमली पदार्थ विरोधी अभियानाच्या विविध पातळ्यांवर कार्यरत असलेल्या संस्थांच्या उदासीन वृत्तीमुळे तसेच तेथे कायद्यांच्या अंमलबजावणीत आवश्यक असलेल्या लवचिकतेचा अभाव असल्यामुळे इच्छित परिणाम हाती येत नव्हते असे त्यांनी सांगितले. मात्र, वर्ष 2014 पासून या परिस्थितीत बदल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडील भागात यंत्रणांचे बळकटीकरण करून त्यांची विश्वसनीयता वाढविण्यावर अधिक भर दिल्यामुळे, केंद्रीय गृह मंत्रालयाने संस्थात्मक पुनर्रचना तसेच अंमली पदार्थ नियंत्रण विभागासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले आहेत. सरकारची कामगिरी अधिक परिणामकारक व्हावी म्हणून मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सतत संपूर्ण सरकार दृष्टीकोनाअंतर्गत आंतर-विभागीय समन्वयावर भर दिला आहे असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. अंमली पदार्थ नियंत्रणासंदर्भात नियमितपणे समन्वय बैठका घ्याव्यात तसेच या विषयासंदर्भात आपापल्या भागात मूलभूत स्तरावर जाणीव निर्माण करावी असे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी या बैठकीला उपस्थित असलेल्या ईशान्येकडील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिले. अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये या पदार्थांच्या पुरवठ्याच्या स्त्रोतापासून हे पदार्थ सेवन करणाऱ्यांपर्यंत सर्व संबंधितांची चौकशी केली गेली पाहिजे, जेणेकरून अंमली पदार्थांचे संपूर्ण जाळेच नष्ट करता येईल असे त्यांनी सांगितले.

 

2006-13

2014-22

 

Total cases

1,257

3,172

152% more cases registered

TotalArrest

1,363

4,888

260% Increase

Seized Drugs

 (KG)

1.52Lakh KG

3.33 Lakh KG

More than doubled

Seized Drugs

 (crore)

768 crore

20 thousand crore

25 times more

 

ईशान्येकडच्या राज्यांसाठी सरकारन अनेक नवीन उपक्रम हाती घेतल्याच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितल आहे. एनसीबी अर्थात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचं प्रादेशिक कार्यालय गुवाहाटी इथ स्थापन करण्यात आलं आहे.आगामी काळात आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा या  चार प्रदेशांत एनसीबीचं कामकाज चालणार आहे. त्रिपुरात आगरतळा इथं आणि अरुणाचल प्रदेशात पासीघाट/लोअर सियांग इथं नवीन प्रादेशिक कार्यालय सुरू करण्याबाबत प्रस्ताव सदर केले जातआहेत यासोबतच लगतच्या सिक्कीम प्रदेशात चांगल्या सेवेचा अंतर्भाव करण्याच्या उद्देशान नवीन जलपैगुडी इथं विभागीय कार्यालय प्रस्तावित असल्याची माहिती शाह यांनी दिली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004MA9F.jpg

ईशान्य भागासह देशाच्या इतर भागात गांजा आणि अफूच्या अवैध लागवडी विरोधात अनेक उपाय योजल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांना कोणतही नुकसान न पोहोचवता डोंगराळ आणि दुर्गम भागात चालणाऱ्या अवैध शेतीच उच्चाटन करण्याच्या उद्देशाने ड्रोन आणि नवीनतम तंत्रज्ञानाचं मोठ्या प्रमाणावर सहाय्य घेत केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालय एक अभ्यास गट स्थापन करत असल्याची माहिती त्यांनी दिली. अवैध पिकांची लागवड करण्यात गुंतलेल्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी पर्यायी व्यवस्था सुचवण्याच्या उद्देशाने आंतरमत्री समिती स्थापन करण्यात आली आहे. यासोबतच, ईशान्य क्षेत्रात होणाऱ्या अवैध अफू लागवडीला पायबंद घालण्यासाठी उपग्रह प्रतिमांचा वापर केला जात असल्याचं ते म्हणाले. अमली पदार्थांशी संबंधित सर्व समस्या सोडवण्यासाठी ईशान्येकडच्या सर्व राज्यांनी अमली पदार्थ विरोधी कृती दलाची एकल नोडल केंद्र म्हणून स्थापना केल्याची माहिती शाह यांनी दिली आहे .देशभरात ईशान्य प्रदेशासह देशभरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 100 कुख्यात तस्करांची ओळख पटवत त्यांना ताब्यात घेण्यासाठी अनेक विशेष सक्तवसुली कृती मोहीमाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

ही केवळ केंद्र-राज्यांची समस्या नसून राष्ट्रीय समस्या आहे आणि याचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय प्रयत्नच व्हायला हवेत असं अमित शाह यांनी सांगितल.अंमली पदार्थ तस्करी विरोधात प्रभावी कार्यवाहीसाठी एनकॉर्ड पोर्टल आणि निदान व्यासपीठाचा योग्य वापर करावा असं आवाहन शाह यांनी बैठकीस हजर असलेल्या ईशान्यकडच्या राज्यांच्या सर्व प्रतिनिधींना केलं आहे. राज्यात स्थापन केलेलं अमली पदार्थ विरोधी कृती दल आणखी मजबूत केल्यान अंमली पदार्थांविरुद्धच्या युद्धात निर्णायक कारवाई करता येईल असं ते म्हणाले. अंमली पदार्थ तस्करांची सखोल चौकशी करून यासाठी येणारा निधीचा ओघ तपासण्याच्या दृष्टीन योग्य उपाययोजना करायला हवी तसच बँकिंग प्राधिकरणाशी योग्य समन्वय राखला पाहिजे असं त्यांनी सांगितल. एनडीपीएस कायद्यातल्या विविध तरतुदींची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे असंही ते म्हणाले. जलद निवाड्यासाठी जलद गती न्यायालयांची स्थापना करावी लागेल असं त्यांनी सांगितल. या बैठकीसं हजर असलेल्या ईशान्य राज्यांच्या प्रतिनिधींनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुक्त भारताचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी केलं.

***

M.Jaybhaye/S.Chitnis/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1866187) Visitor Counter : 184