आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड - 19 लसीकरण मोहिमेची व्याप्ती 218.93 कोटी मात्रांपर्यंत वाढली


12 ते 14 या वयोगटातील 4.10 कोटी बालकांना पहिली मात्रा देण्यात आली आहे

देशातील उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या आता 29,251

गेल्या 24 तासांत 2,797 नवे रुग्ण आढळले

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्या 1.30 टक्के

Posted On: 08 OCT 2022 11:39AM by PIB Mumbai

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 218.93 (2,18,93,14,422) कोटींची संख्या ओलांडली आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. आतापर्यंत 4.10 (4,10,64,468)  कोटींपेक्षा जास्त किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. तसेच 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक लसींच्या मात्रा देण्‍यास आरंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415252

2nd Dose

10119360

Precaution Dose

7040031

FLWs

1st Dose

18436923

2nd Dose

17717388

Precaution Dose

13681138

Age Group 12-14 years

1st Dose

41064468

2nd Dose

31895963

Age Group 15-18 years

1st Dose

61959007

2nd Dose

53138901

Age Group 18-44 years

1st Dose

561320703

2nd Dose

515948517

Precaution Dose

97467582

Age Group 45-59 years

1st Dose

204036872

2nd Dose

197002149

Precaution Dose

49498844

Over 60 years

1st Dose

127673637

2nd Dose

123167762

Precaution Dose

47729925

Precaution Dose

21,54,17,520

Total

2,18,93,14,422

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 29,251 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.07 टक्के इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे. गेल्या 24 तासांत 3,884 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे, आतापर्यंत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या सुरूवातीपासून) वाढून 4,40,51,228 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 2,797 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 2,66,839 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.67 (89,67,48,226) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.30 टक्के तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.05 टक्के इतका आहे.

***

H.Raut/S.Patgaonkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1866003) Visitor Counter : 158