वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) ने स्टार्टअप्ससाठी पत हमी योजना (CGSS) सुरु करण्याची जारी केली अधिसूचना

Posted On: 07 OCT 2022 8:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑक्‍टोबर 2022

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयमंत्रालयांतर्गत असलेल्या  उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT), शेड्यूल्ड वाणिज्यिक  बँका, बिगर -बँकिंग वित्तीय कंपन्या आणि भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाच्या  (SEBI) नोंदणीकृत पर्यायी गुंतवणूक निधीअंतर्गत  (AIFs) स्टार्टअप्ससाठी  दिलेल्या  विस्तारित कर्जांना पत हमी  प्रदान करण्याच्या उद्देशाने पत हमी योजना (CGSS) सुरु करण्याचे अधिसूचित केले आहे.

सदस्य संस्थांनी पात्र कर्जदारांना दिलेल्या  कर्जांवर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पत हमी  प्रदान करणे, हा पत हमी योजने(CGSS) चा उद्देश आहे. उदा. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने जारी केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेमध्ये परिभाषित केल्यानुसार आणि वेळोवेळी सुधारित केलेल्या स्टार्टअप्सना हा लाभ मिळू शकेल. या योजनेअंतर्गत असलेली पत हमी ही व्यवहारांवर आणि त्यांच्या  छत्रा अंतर्गत  अवलंबून असेल.  वैयक्तिक प्रकरणांसाठीची हमी प्रत्येकी  10 कोटी रुपये  किंवा कर्जाची वास्तविक थकबाकीची  क्रेडिट यापैकी जे कमी असेल, त्या रकमेसाठी  दिली जाईल.

व्यवहारांवर आधारित हमी च्या संरक्षक छत्राखाली, सदस्य संस्थांद्वारे दिले जाणारे हमी कवच  एकल पात्र कर्जदाराच्या आधारावर प्राप्त केले जाते. व्यवहार आधारित हमी,  पात्र स्टार्टअप्सना बँका/गैर बँकिंग वित्तीय संस्थांद्वारे कर्ज देण्यास प्रोत्साहन देतील. कर्ज मंजुरीची मूळ रक्कम 3 कोटी, रुपयांपर्यंत  असल्यास व्यवहार-आधारित संरक्षणाची व्याप्ती डिफॉल्ट रकमेच्या 80% असेल.  कर्ज मंजुरीची मूळ रक्कम ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांच्या आत असल्यास डिफॉल्ट रकमेच्या 75%. असेल, आणि  कर्ज मंजुरीची मूळ रक्कम  5 कोटी रुपयांपेक्षा जास्त  (प्रति कर्जदार रु. 10 कोटी पर्यंत).असल्यास डिफॉल्ट रकमेच्या 65%. असेल.

छत्रांतर्गत (अम्ब्रेला बेस्ड) असलेले हमी कवच भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाच्या पर्यायी गुंतवणूक निधी नियमांतर्गत नोंदणीकृत (भारतीय स्टार्टअप परिसंस्थेमधील  निधीचा वाढता भाग) व्हेंचर डेट फंड (VDF) ला त्यांनी उभारलेल्या निधीचे स्वरूप आणि त्यांनी दिलेले कर्ज निधी पाहता हमी प्रदान करेल.  छत्रांतर्गत कव्हरची व्याप्ती वास्तविक तोटा किंवा जास्तीत जास्त 5% संकलित गुंतवणूक यापैकी ज्यावर पात्र स्टार्टअप्समधील निधीतून कव्हर घेतले जात आहे, त्यापैकी  जे कमी असेल ते  प्रति कर्जदार  जास्तीत जास्त १० कोटी रुपये  इतके आहे.

ही योजना कार्यान्वित करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणांसोबत, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, योजनेचे पुनरावलोकन, पर्यवेक्षण आणि कार्यान्वयन पर्यवेक्षण करण्यासाठी व्यवस्थापन समिती (MC) आणि एक जोखीम मूल्यांकन समिती (REC) स्थापन करेल. राष्ट्रीय पत हमी विश्वस्त कंपनी लिमिटेड (NCGTC) ही योजना कार्यान्वित करणार आहे.

 

* * *

S.Patil/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1865936) Visitor Counter : 410