पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

चित्ता कृती दलाची स्थापना


हे कृती दल नव्या परिस्थितीसोबत चित्यांच्या जुळवून घेण्याच्या आणि आरोग्यविषयक स्थितीच्या प्रगतीचा आढावा घेईल आणि देखरेख ठेवेल.

चित्ता कृती दल, पर्यटनविषयक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सूचना आणि सल्ला देईल

चित्ता परत आणण्यामुळे परिसंस्थेच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे परिणाम अपेक्षित

Posted On: 07 OCT 2022 5:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑक्‍टोबर 2022

 

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान आणि अन्य उपयुक्त निर्दिष्ट क्षेत्रात सोडण्यात आलेल्या चित्त्यांवर देखरेख ठेवण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने कृती दलाची स्थापना केली आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) चित्ता कृती दलाला कामासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देईल  आणि सर्व आवश्यक मदत करेल. हे कृती दल चित्ते ज्या ठिकाणी सोडण्यात आले आहेत त्या  क्षेत्राला जसे आणि जेव्हा ठरवल्याप्रमाणे नियमितपणे भेट देण्यासाठी उपसमिती नियुक्त करू शकते.

चित्त्यांना परत आणणं हा चित्त्याचा मूळ अधिवास आणि त्यांची जैवविविधता पुनर्स्थापित करण्याच्या मूळ स्वरूपाचा किंवा नमुन्याचा एक भाग आहे. यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास आणि झपाट्याने होणारी हानी रोखण्यास मदत होईल. मोठ्या प्रमाणात हिंस्र असलेल्या पशूला परत आणण्यामुळे ऐतिहासिक उत्क्रांती संतुलनाचे पुनरुज्जीवन होते. परिणामी परिसंस्थेच्या  विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. चित्ता परत आणण्यामुळे परिसंस्थेच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे परिणाम अपेक्षित आहेत. चित्ता ही उत्क्रांतीवादी नैसर्गिक निवड शक्ती आहे. ज्याने  भारतीय काळवीट  आणि हरणांमधील वेगवान अनुकूलनाला आकार दिला आहे. चित्त्यांना परत आणून  आपण धोक्यात असलेल्या काही प्रजातींचा समावेश असलेल्या केवळ भक्ष्य बनणाऱ्याच  नव्हे   तर  गवताळ प्रदेश/खुल्या जंगलातील परिसंस्थांमधील  इतर लुप्तप्राय प्रजाती, ज्यापैकी काही नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत, त्यांनाही वाचवू शकू.

कृती दलाची स्थापना पुढील कारणासाठी करण्यात आली आहे:

  1. चित्त्यांच्या  आरोग्य स्थितीचे  अवलोकन, प्रगती आणि निरीक्षण करणे, चित्त्यांना विलगीकरणात  ठेवणे, त्यांना बाहेरील वातावरणाशी जुळवून घेता यावं यासाठी प्रयत्न करणे, संपूर्ण परिसराची  संरक्षणविषयक स्थिती,  वन आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित  प्रोटोकॉलचे पालन करणे, मध्य प्रदेश वन विभाग आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) यांना भारतातील चित्त्यांबद्दल  माहिती आणि योग्य सल्ला  देणे , चित्त्यांचे  एकूण आरोग्य, तसेच वर्तन आणि त्यांची देखभाल  या संदर्भात मार्गदर्शन करणे.
  2. कुनो राष्ट्रीय उद्यानातील वातावरणाशी चित्ते किती एकरूप होतात आणि त्यांची शिकार करण्याची कौशल्ये यावर देखरेख ठेवणे.
  3. चित्त्यांना विलगीकरणातून काहीशा बाहेरील वातावरणात सोडणे आणि त्यानंतर गवताळ जमिनीवरून मग खुल्या जंगलात सोडणे या सर्व प्रक्रियांवर देखरेख ठेवणे.
  4. चित्त्यांच्या अधिवासाला पर्यावरणीय पर्यटनाचे स्वरूप देणे आणि त्यासंदर्भात  नियम सुचवणे.
  5. कुनो नॅशनल पार्क आणि इतर संरक्षित क्षेत्रांमध्ये पर्यटनाशी संबंधित पायाभूत सोईसुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने नवनवीन कल्पना सुचवणे आणि योग्य मार्गदर्शन करणे.
  6. चित्ता मित्र आणि स्थानिक नागरिकांमध्ये  सर्वसाधारणपणे  वन्यजीव संरक्षणात विशेषत: चित्यांच्या संरक्षणात सहभाग वाढवण्यासाठी  जागृती करण्याच्या दृष्टीने त्यांच्या सतत संपर्कात राहणे

कृतिदलामध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे:

  1. प्रधान सचिव (वने), मध्य प्रदेश
  2. प्रधान सचिव (पर्यटन), मध्य प्रदेश
  3. प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वन दलाचे प्रमुख, मध्य प्रदेश
  4. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि मुख्य वन्यजीव संरक्षक, मध्य प्रदेश
  5. आलोक कुमार, सेवानिवृत्त. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि मुख्य वन्यजीव संरक्षक, मध्य प्रदेश
  6. डॉ. अमित मलिक , महानिरीक्षक, एनटीसीए, नवी दिल्ली
  7. डॉ. विष्णू प्रिया,  शास्त्रज्ञ, भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून
  8. अभिलाष खांडेकर, सदस्य मध्‍य प्रदेश स्‍टेट बोर्ड फॉर वाईल्‍ड लाईफ
  9. सुभोरंजन सेन, प्रधान मुख्य वनसंरक्षक- वन्यजीव - सदस्य निमंत्रक

 

* * *

S.Patil/B.Sontakke/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1865868) Visitor Counter : 222


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Telugu