राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा

Posted On: 04 OCT 2022 6:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑक्‍टोबर 2022

 

दसरा म्हणजेच विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभसंदेशात त्या म्हणतात:--

“विजयादशमीच्या या मंगल प्रसंगी, मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देते.

संपूर्ण देशभर विजयादशमीचा उत्सव सुष्ट शक्तीने दुष्ट शक्तींवर, सत्याने असत्यावर, अनैतिकतेने नैतिकतेवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण ‘दशहरा ‘म्हणून साजरा करतात आणि श्रीरामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून रावण दहन केले जाते. आदर्श आणि योग्य मर्यादाशील वर्तणूकीचा जो आदर्श प्रभू रामांनी आपल्याला घालून दिला आहे,तो पिढ्यानपिढ्या अनेक लोकांना प्रेरणा देत आला आहे.

तर, पूर्व भारतात, आज दसऱ्याच्या मिरवणुकीनंतर दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. हा सन म्हणजे भारताच्या सांस्कृतिक एकतेचे आदर्श उदाहरण आहे.

“आजही ह्या उत्सवापासून आपल्याला शाश्वत मूल्ये आणि नैतिकता, सत्य तसेच चांगुलपणाची प्रेरणा मिळावी, तसेच आपण सगळ्यांना शांततामय आणि सौहार्दपूर्ण आयुष्य जागता यावे, अशी मी प्रार्थना करते”.

राष्ट्रपतींचा संपूर्ण संदेश ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


* * *

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1865157) Visitor Counter : 229