रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सणासुदीच्या हंगामात प्रवाशांना सुरळीत आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वेने अधिसूचित केल्या 179 विशेष सेवांच्या जोड्या


या 179 विशेष सेवा करणार एकूण 2269 फेऱ्या

प्रमुख स्थानकांवरील गर्दीच्या व्यवस्थापनाला दिले जाणार प्राधान्य

रेल्वे मार्गांवरील देशभरातील प्रमुख स्थानके जोडण्यासाठी करण्यात आले विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन

Posted On: 04 OCT 2022 6:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑक्‍टोबर 2022

 

सध्या सुरु असलेल्या सणासुदीच्या काळात, रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, भारतीय रेल्वेने यावर्षी छठ पूजेपर्यंत 179 विशेष गाड्यांच्या (जोड्यांमध्ये) 2269 फेऱ्या चालवण्याचे नियोजन केले आहे. रेल्वे मार्गावरील दिल्ली-पटना, दिल्ली-भागलपूर, दिल्ली-मुझफ्फराबाद, दिल्ली-सहरसा यासारख्या देशभरातील प्रमुख स्थानकांना जोडण्यासाठी या विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.  

गाड्यांच्या अनारक्षित डब्यांमध्ये प्रवाशांचा प्रवेश व्यवस्थित व्हावा यासाठी आरपीएफ अर्थात रेल्वे पोलीस दलाच्या देखरेखीखाली रेल्वेच्या अंतीम स्थानकांवर (टर्मिनस) रांगा लावून गर्दीचे व्यवस्थापन केले जात आहे.    

प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रमुख स्थानकांवर आरपीएफ चे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. गाड्या सुरळीत चालाव्यात यासाठी प्रमुख स्थानकांवर आपत्कालीन सेवेसाठी अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे सेवेतील कोणताही व्यत्यय प्राधान्याने हाताळण्यासाठी विविध विभागांमध्ये कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

फलाट क्रमांकासह गाड्यांच्या आगमन/प्रस्थानाची वारंवार आणि वेळेवर घोषणा करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांना सहाय्य आणि मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वाच्या स्थानकांवर "आपल्याला मदत हवी आहे का" बूथ कार्यरत ठेवले गेले आहेत. या ठिकाणी आरपीएफ कर्मचारी आणि टीटीई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महत्वाच्या स्थानकांवर चोवीस तास आरोग्य पथके उपलब्ध आहेत. सह-वैद्यकीय (पॅरामेडिकल) पथकासह रुग्णवाहिका देखील उपलब्ध आहे.

आसने राखून ठेवणे, अतिरिक्त शुल्क घेणे आणि दलाली यासारख्या सुरक्षा आणि दक्षता विभागाच्या कर्मचार्‍यांकडून केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवले जात आहे आणि त्याचे कठोर निरीक्षण केले जात आहे. स्थानकांवर एकूण स्वच्छता, विशेषतः प्रतीक्षा दालने, आरामाच्या खोल्या, रेल्वे फलाट या ठिकाणी स्वच्छता राखण्याबाबतच्या सूचना विभागीय मुख्यालयांनी दिल्या आहेत.    

NOTIFIED CHHATH,DIWALI,PUJA SPECIAL-2022                  (as on 03.10.22)

S.NO.

Rly.

NO. OF SPL. (in pair)

NO. OF TOTAL TRIPS

1

CR

7

100

2

ECR

9

128

3

ECOR

6

94

4

ER

14

108

5

NR

35

368

6

NCR

8

223

7

NER

2

34

8

NFR

4

64

9

NWR

5

134

10

SR

22

56

11

SER

2

14

12

SCR

19

191

13

SWR

22

433

14

WCR

6

16

15

WR

18

306

 

G.TOTAL

179

2269

 

* * *

G.Chippalkatti/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1865152) Visitor Counter : 476