नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते कोल्हापूर आणि मुंबई दरम्यानच्या थेट विमानसेवेचे उद्घाटन
कोल्हापूर विमानतळाचा विस्तारित परिसर पुढच्या महिन्यात वापरासाठी खुला होईल तसेच अंतर्देशीय टर्मिनल इमारतीचे उद्घाटन मार्च 2023 मध्ये होईल : सिंधिया
उडान योजनेअंतर्गत आतापर्यंत 433 नवे मार्ग सुरु करण्यात आले आहेत आणि एक कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला आहे
Posted On:
04 OCT 2022 6:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2022
नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि राज्यमंत्री जनरल विजय कुमार सिंग (सेवानिवृत) यांनी आज कोल्हापूर आणि मुंबई दरम्यानच्या थेट विमान वाहतूक सेवेचे उद्घाटन केले.
श्रेणी 2 आणि श्रेणी 3 शहरांना हवाई जोडणी आणि सर्वांना परवडणाऱ्या दरात प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी आर सी एस उडान योजनेअंतर्गत ही विमानसेवा सुरु करण्यात आली आहे.
ही विमानसेवा कोल्हापूर आणि मुंबई दरम्यान आठवड्यातून तीन दिवस - मंगळवार, गुरुवार आणि शनिवार - उपलब्ध असेल. या सेवेचे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल:
Flt No.
|
From
|
To
|
Freq
|
Dep. Time
|
|
Arr. Time
|
Eff. from
|
S5 161
|
BOM
|
KLH
|
2,4,6
|
1030 hrs
|
|
1125hrs
|
4th October 2022
|
S5 162
|
KLH
|
BOM
|
2,4,6
|
1150 hrs
|
|
1245hrs
|
4th October 2022
|
देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दारात विमानसेवा पुरविण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न उडान योजनेमुळे साकार होत आहे, असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले. उडान योजनेअंतर्गत आतापर्यंत 433 नवे मार्ग सुरु करण्यात आले आहेत आणि एक कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला आहे. या विमानतळ परिसराचा लवकरच विस्तार केला जाईल, आणि नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्याचे लोकार्पण होईल, अशी ग्वाही ज्योतिरादित्य सिंधीया यांनी दिली. मार्च 2023 पर्यंत टर्मिनल इमारतीचेही उद्घाटन होईल, असे सिंधीया यांनी सांगितले.
नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री, जनरल विजय कुमार सिंह (सेवानिवृत्त) यांनी यावेळी कोल्हापूर आणि मुंबईच्या लोकांचे अभिनंदन केले. या विमानसेवेमुळे केवळ आरामदायी प्रवासाची सोय होणार नाही, तर या प्रदेशातील व्यापार आणि वाणिज्यविषयक घडामोडींनाही वेग येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, हातकणंगल्याचे खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, राज्याचे उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव उषा पाध्ये, स्टार एअरचे अध्यक्ष संजय घोडावत, स्टार एअरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन सिमरन सिंग तिवाना यांच्यासह हवाई वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि स्टार एअरमधील इतर मान्यवर देखील उपस्थित होते.
* * *
M.Pange/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865134)
Visitor Counter : 175