राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 आणि 4 ऑक्टोबरला गुजरात दौऱ्यावर
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2022 10:08PM by PIB Mumbai
भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू, येत्या 3 आणि 4 ऑक्टोबर 2022ला गुजरात राज्याच्या दौ-यावर जाणार आहेत. भारताच्या राष्ट्रपती म्हणून त्यांचा हा पहिलाच गुजरात दौरा असेल.
3 ऑक्टोबर 2022 रोजी, अहमदाबादमधील साबरमती आश्रमाला राष्ट्रपती भेट देऊन,त्यांच्या दौऱ्याला प्रारंभ करतील. दुपारनंतर, त्या गांधीनगर येथील गुजरात वैद्यकीय आणि शैक्षणिक संशोधन सोसायटी (GMERS), आरोग्य, सिंचन, पाणीपुरवठा आणि बंदर विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन / पायाभरणी करतील.त्याच दिवशी संध्याकाळी, गांधीनगरमध्ये गुजरात सरकारने त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या नागरी स्वागत समारंभात त्या सहभागी होतील.
4 ऑक्टोबर, 2022 रोजी, राष्ट्रपती महिला उद्योजकांसाठी तैय्यार केलेल्या गुजरात विद्यापीठातील एक स्टार्ट-अप व्यासपीठ 'हर स्टार्ट' ('herStart') या मंचाचे उदघाटन करतील, तसेच अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठातील, शिक्षण आणि आदिवासी विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांचे उदघाटन / पायाभरणी करतील.
***
S.Bedekar/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1864606)
आगंतुक पटल : 203