संरक्षण मंत्रालय
महात्मा गांधी जयंतीनिमित्त संरक्षण संशोधन विकास संस्थेचे अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांनी गांधी यांना वाहिली पुष्पांजली
देशातील संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या सर्व आस्थापनांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम 2.0 चा केला प्रारंभ
Posted On:
02 OCT 2022 4:03PM by PIB Mumbai
संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या नवी दिल्लीतील मुख्यालयातील केंद्रभागी असलेल्या गांधीजींच्या प्रतिमेस, आज महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त, संरक्षण संशोधन विकास संस्थेचे (डीआरडीओ) सचिव डॉ. समीर व्ही कामत, डीआरडीओचे महासंचालक, संचालक,तसेच मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुष्पांजली अर्पण केली. डीआरडीओच्या प्रलंबित बाबींचा निपटारा करण्यासाठी आणि स्वच्छता मोहिमेसाठी एका विशेष अभियानाचा देखील आज आरंभ करण्यात आला.पंतप्रधान कार्यालयातून आलेले प्रलंबित संदर्भ, राज्य सरकारांकडून आलेले प्रलंबित संदर्भ, आंतर-मंत्रालयीन प्रलंबित संदर्भ (कॅबिनेट नोट), तीन महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित असलेली संसदीय आश्वासने,प्रलंबित सार्वजनिक तक्रारी आणि अपीले, स्वच्छता मोहिमेच्या ठिकाणांच्या जागा निश्चित करणे, अंतराळ व्यवस्थापन नियोजन यासह विशिष्ट क्षेत्रातील विशेष प्रलंबित मोहिमांच्या नोंदीच्या व्यवस्थापनावर (रेकॉर्डचे डिजिटायझेशन) विशेष लक्ष केंद्रित करून भंगाराची साफसफाई यावेळी केली जाणार आहे. हा उपक्रम 2 ऑक्टोबर 2022 ते 31ऑक्टोबर 2022 या कालावधीत संरक्षण मंत्रालयाने हाती घेतलेल्या स्वच्छता विषयक विशेष मोहिम 2.0 याचा एक भाग आहे.
याचबरोबर, फिट इंडिया फ्रीडम रन (FIFR) 3.0 चा भाग म्हणून आज डीआरडीओच्या मुख्यालयात फिट इंडिया प्लॉग रन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्लॅग रनमध्ये 250 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.या उपक्रमाद्वारे, फिट इंडिया मिशन हे स्वच्छ भारत अभियानाशी जोडले गेले आहे. धावता धावता, वाटेत कचरा, प्लास्टिक दिसले तर उचलून त्या भागाची स्वच्छता करण्याचे काम केले जाते. डीआरडीओ मुख्यालयाच्या विविध संचालनालयांनीही आपापल्या भागात आणि कार्यालयांमध्ये आज स्वच्छता मोहीम हाती घेतली होती.
***
S.Bedekar/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1864485)
Visitor Counter : 132