ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीवर देखरेख ठेवण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाकडून राष्ट्रीय पातळीवरील क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन


किंमतविषयक माहितीचा दर्जा आणि सातत्य यावर राज्यातील नोडल अधिकारी ठेवणार लक्ष

Posted On: 01 OCT 2022 3:02PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने, काल (30 सप्टेंबर 2022) नवी दिल्लीत अत्यावश्यक वस्तूंच्या दरांवर देखरेख ठेवण्यासाठीच्या एकदिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन केले होते. वस्तूंच्या किमतीच्या संकलनाची भौगोलिक व्याप्ती वाढवणे, किंमतविषयक माहितीचा (डेटा) दर्जा सुधारणे आणि त्यातून विश्लेषणात्मक  निष्कर्ष काढणे, अशा सर्व उपक्रमांचा या कार्यशाळेत समावेश करण्यात आला होता. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश, राज्यातील नोडल अधिकाऱ्यांना किंमतविषयक डेटाच्या महत्त्वाविषयी जागृत करणे, तसेच किमतीचे संकलन नेमके कसे केले जाते, याची पद्धत शिकवणे आणि प्रादेशिक/राज्यस्तरीय पातळीवरक्षमता बांधणी कार्यशाळांसाठी आराखडा करणे, किमतीची  माहिती देणाऱ्या केंद्रांची क्षमता वाढवणे हा होता.

कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी, ग्राहक व्यवहार विभागाचे एस सचिव रोहित कुमार सिंग, यांनी दरविषयक माहिती संकलनात राज्यांच्या सर्व प्रतिनिधींनी केलेल्या उत्तम कामगिरीचे कौतुक केले. किमतीवर देखरेख ठेवणे, दरविषयक माहिती गोळा करणे, आणि विविध धोरणनिर्मिती करतांना ह्या आकडेवारी आणि माहितीचा केला जाणारा वापर या सगळ्याचे महत्त्व  सचिवांनी यावेळी समजावून सांगितले.

राज्यांच्या  नोडल अधिकाऱ्यांनी किमतविषयक आकडेवारीची गुणवत्ता आणि सातत्य यावर भर द्यावा, असेही सचिव यावेळी म्हणाले. देशभरातील सर्व जिल्ह्यात, किमती संकलन केंद्रे असल्यास, त्यातून अधिक अचूक आणि योग्य माहिती मिळू शकेल, अशी सूचनाही त्यांनी केली.

दर नियंत्रण डेटा (PMD) च्या अद्यायवतीकरणासाठी, आशियाई विकास बँकेकडून तंत्रज्ञानविषयक सहाय्य केले जाते.  यावेळी, कृष्ण सिंह रौतेला यांनी एडीबीकडून दिल्या जाणाऱ्या सहाय्याची माहिती दिली . तसेच, सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने, किमतीवर देखरेख ठेवणे किती महत्वाचे आहे, हा मुद्दाही भाषणात अधोरेखित केला.

कार्यशाळेच्या तांत्रिक सत्राच्या वेळी, दर संकलन अॅपविषयी विस्तृत चर्चा झाली. तसेच, संकलन प्रकियेतील आव्हाने, तंत्रसाधनांनी युक्त, डेटा दर्शवणारा डॅशबोर्ड आणि धोरणांविषयी सविस्तर माहिती, अशा सगळ्या गोष्टींची चर्चा नोडल अधिकाऱ्यांशी करण्यात आली.

ह्या कार्यशाळेच्या समारोप सत्रात, राज्यातील नोडल अधिकाऱ्यांशी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्यांनी विभागामधील विविध विकास,माहिती संकलन यंत्रणेविषयक मार्गदर्शक सूचना तसेच क्षमता बांधणी कार्यशाळा घेण्यासाठीचा आराखडा विकसित करणे, अशा विविध विषयांवर विचारलेल्या  शंका आणि प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. समारोप करतांना ग्राहक व्यवहार विभागाचे आर्थिक सल्लागार, के गुइटे यांनी सर्व सहभागी प्रतिनिधीचे दर नियंत्रण आकडेवारी संकलनात देत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच ह्या संकलनाची गुणवत्ता वाढवण्यावर त्यांनी भर दिला.. 

***

S.Kakade/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864101) Visitor Counter : 150


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu