संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्र्यांनी आसाममधील दिनजान येथे लष्कराच्या तळाला दिली भेट; प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सुसज्जतेचा घेतला आढावा

Posted On: 28 SEP 2022 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2022

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सप्टेंबर 28, 2022 रोजी आसाममधील दिनजान येथे लष्कराच्या तळाला भेट दिली. संरक्षण मंत्री सप्टेंबर 30, 2022 पर्यंत आसाम आणि अरुणाचल या राज्यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून, आपल्या भेटीत ते लष्कराच्या सीमा भागातील आघाडीच्या चौक्यांना भेट देतील. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, पूर्व कमांड लेफ्टनंट जनरल आरपी कलिता आणि इतर वरिष्ठ अधिकारी त्यांच्याबरोबर आहेत.

आपल्या भेटीदरम्यान राजनाथ सिंह यांनी देशाच्या पूर्व भागात तैनात लष्कराच्या सुसज्जतेचा आढावा घेतला. जनरल ऑफिसर कमांडिंग, 3 कॉर्प्स लेफ्टनंट जनरल आर सी तिवारी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना प्रत्यक्ष सीमा रेषा (एलएसी) वरील पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत तसेच क्षमता विकास आणि परिचालन सज्जतेबाबत माहिती दिली. आघाडीवर तैनात असलेल्या सैन्याची कार्य-तत्परता वाढेल अशा  अत्याधुनिक लष्करी उपकरणे आणि तंत्रज्ञानाच्या वापराबाबतही संरक्षण मंत्र्यांना माहिती देण्यात आली.

राजनाथ सिंह सप्टेंबर 29, 2022 रोजी लष्कराच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी सीमा रेषेजवळील प्रमुख  चौक्यांना भेट देतील आणि जवानांशी संवाद साधतील.

संरक्षण मंत्री त्यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात सीमा रस्ते संघटनेच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचाही आढावा घेतील.   


* * *

S.Kane/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1863139) Visitor Counter : 154