अर्थ मंत्रालय
केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत द्यायला मंत्रिमंडळाची मंजुरी; संबंधितांना 01.07.2022 पासून देय रकमेचा लाभ मिळणार
प्रविष्टि तिथि:
28 SEP 2022 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना, जून, 2022 रोजी संपलेल्या कालावधीत अखिल भारतीय उपभोक्ता मूल्य निर्देशांकाच्या 12 महिन्यांच्या टक्केवारीतील सरासरी वृद्धीवर आधारित रकमेच्या 4% इतका महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा अतिरिक्त हप्ता 01.07.2022 पासून जारी करायला मान्यता दिली आहे.
केंद्रसरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक अनुक्रमे महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या अधिक रकमेसाठी 01.07.2022 पासून पात्र ठरतील.
केंद्रसरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे पडणारा अतिरिक्त आर्थिक भार वर्षाला अंदाजे 6,591.36 कोटी रुपये तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये (म्हणजेच, जुलै, 2022 ते फेब्रुवारी, 2023 या 8 महिन्यांच्या काळासाठी) 4,394.24 कोटी रुपये इतका असेल.
निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई सवलतीत वाढ झाल्यामुळे पडणारा अतिरिक्त आर्थिक भार वर्षाला अंदाजे 6,261.20 कोटी रुपये; आणि आर्थिक वर्ष 2022-23 (म्हणजेच जुलै, 2022 ते फेब्रुवारी, 2023 या 8 महिन्यांच्या काळासाठी) 4,174.12 कोटी रुपये इतका असेल.
महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार वर्षाला अंदाजे 12,852.56 कोटी रुपये, तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये (म्हणजेच जुलै, 2022 ते फेब्रुवारी, 2023 या 8 महिन्यांच्या काळासाठी) 8,568.36 रुपये इतका असेल.
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1862996)
आगंतुक पटल : 260