कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी राज्य सरकारांना आयएएस आणि इतर अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांच्या केंद्रीय प्रतिनियुक्तीची सुविधा देण्याचे दिले निर्देश
Posted On:
28 SEP 2022 4:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2022
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्य सरकारांना आयएएस आणि इतर अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांच्या केंद्रीय प्रतिनियुक्तीची सुविधा देण्याचे निर्देश दिले.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या कार्मिक, सामान्य प्रशासन आणि प्रशासकीय सुधारणा विभागाच्या प्रधान सचिवांच्या वार्षिक परिषदेला संबोधित करताना सिंह म्हणाले, केंद्रीय प्रतिनियुक्ती हा आपल्या देशातील संघराज्य संरचनेचा भाग आहे आणि यासंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारांनी केंद्र सरकारला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, अखिल भारतीय सेवांच्या संवर्ग व्यवस्थापनासाठी एक व्यवस्था अस्तित्वात असून, तिचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांची केंद्रातील नियुक्ती ही या संदर्भातील विशेष बाब असल्याचे ते म्हणाले.

सिंह म्हणाले, ते राज्य सरकारांना केंद्र सरकारने वेळोवेळी प्रसारित केलेल्या अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांच्या प्रभावी सेवा आणि दक्षता व्यवस्थापनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची विनंती करतील. प्रशिक्षणाच्या पैलूवर बोलताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, सरकारी अधिकाऱ्याकडून सर्वोत्तम कामगिरी व्हावी यासाठी त्याला पुरेसे प्रशिक्षण दिले पाहिजे आणि केंद्र सरकारने आपल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रभावी प्रशिक्षण मॉड्यूल तयार केली आहेत. ते म्हणाले, केंद्र सरकारने राज्य सरकारी अधिकार्यांसाठी, विशेषत: अत्याधुनिक स्तरावर काम करणार्यांसाठी एक मॉड्यूल देखील तयार केले आहे. राज्य सरकारांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1862960)
Visitor Counter : 83