गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गुजरातमधील कलोल येथे 150 खाटांच्या ईएसआयसी रुग्णालयाची आणि उमिया माता केपी शैक्षणिक न्यासाच्या 750 खाटांच्या आदर्श मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाला, विशेषत: गरिबांना निरामय आरोग्याचा अधिकार केला सुनिश्चित

Posted On: 27 SEP 2022 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2022

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह  यांनी  आज गुजरातमधील कलोल येथे 150 खाटांच्या ईएसआयसी रुग्णालयाची आणि  उमिया माता केपी शैक्षणिक न्यासाच्या  750 खाटांच्या आदर्श मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची  पायाभरणी केली. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री   भूपेंद्र पटेल, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री  मनसुख मांडविय, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री  भूपेंद्र यादव तसेच  कामगार आणि रोजगार राज्यमंत्री  रामेश्वर तेली हे देखील उपस्थित होते.

आज कलोलमध्ये दोन मोठ्या रुग्णालयांची पायाभरणी होत आहे. या रुग्णालयांच्या माध्यमातून  कलोल तालुका आणि शहरातील सर्व नागरिकांना चांगल्या उपचार सुविधा मिळतील, असे अमित शाह  यांनी आपल्या भाषणात सांगितले. उमिया माताजी कडवा पाटीदार न्यासाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयामध्ये 35 टक्के गरीब रुग्णांना विनामूल्य आरोग्य सेवा मिळणार असल्याचे  शाह  यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय कामगार मंत्री  भूपेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी राज्य विमा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून देशभरातील कामगारांना त्याचा लाभ मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीला विशेषतः गरीबांना निरामय आरोग्याचा अधिकार दिला आहे.प्रधानमंत्री आयुष्मान योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 कोटी गरीब व्यक्तींना 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले

 64,000 कोटी रुपयांचे आयुष्मान आरोग्य पायाभूत सुविधा अभियान  ही गरिबांसाठी पहिलीच अशाप्रकारची  मोठी योजना आहे.या योजनेअंतर्गत600 हून अधिक जिल्ह्यांमध्ये गंभीर आजारांवरील उपचारासाठी (क्रिटीकल केअर) 35,000 नवीन खाटा  उपलब्ध करून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 730 जिल्ह्यांमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि महामारीशी निगडित विविध प्रमुख आजारांसाठी 1600 कोटी रुपयांची तरतूद करून संशोधन केंद्र सुरू करण्याचे काम केले आहे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.

 

R.Aghor /S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1862626) Visitor Counter : 165