श्रम आणि रोजगार मंत्रालय
सानंद येथे 350 खाटांच्या ईएसआयसी रुग्णालयाची गृहमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी
गावकऱ्यांसह 12 लाख कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना या रुग्णालयामुळे मिळणार आरोग्य सुविधांचा लाभ
आरोग्य पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधानांच्या सर्वांगीण दृष्टिकोनाचा गृहमंत्र्यांनी केला पुनरुच्चार
प्रविष्टि तिथि:
26 SEP 2022 5:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2022
गुजरातच्या अहमदाबादमधील सानंद येथे केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज 350 खाटांच्या (500 खाटांपर्यंत सुसज्ज करण्यायोग्य) ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालयाची पायाभरणी केली. 350 खाटांच्या रुग्णालयात ओपीडी, अंतर्गत सुविधा, एक्स-रे, रेडिओलॉजी, प्रयोगशाळा, ऑपरेशन थिएटर, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ सुविधा, आयसीयू आणि अल्ट्रासाऊंडसह इतर आधुनिक सुविधा असतील. 9.5 एकरावरील रुग्णालयाच्या बांधकामासाठी 500 कोटी रुपये खर्च येईल. ते लवकरच आवश्यकतेनुसार 500 खाटांच्या रुग्णालयात अद्ययावत केले जाऊ शकते. हे रुग्णालय सानंदच्या ग्रामस्थांसह 12 लाख कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

गृहमंत्री, अमित शाह यांनी, आरोग्य पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधानांच्या त्रिस्तरीय सर्वांगीण दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला ज्यामध्ये वैद्यकीय विज्ञान पायाभूत सुविधांचा विस्तार आणि मनुष्यबळ; आयुष सारख्या पारंपारिक भारतीय औषधांना मुख्य प्रवाहात आणणे; आणि तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे तज्ज्ञांची उपलब्धता वाढवणे यांचा समावेश होतो.
केंद्रीय कामगार आणि रोजगार, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री,भूपेंद्र यादव यांनी यावेळी सांगितले की, राज्य आणि प्रशासनाच्या सहकार्याने परिणाम प्रभावीपणे साध्य करणे शक्य आहे. ते म्हणाले की, 500 खाटांचे रुग्णालय हे अत्याधुनिक रुग्णालयांपैकी एक असेल ज्यामध्ये केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही तर परिसरातील सर्व ग्रामस्थांनाही उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील. कोणतीही व्यक्ती आरोग्य सुविधांपासून वंचित राहणार नाही, असेही मंत्री म्हणाले.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1862283)
आगंतुक पटल : 196