गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सानंद येथे 350 खाटांच्या ईएसआयसी रुग्णालयाची गृहमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी


गावकऱ्यांसह 12 लाख कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना या रुग्णालयामुळे मिळणार आरोग्य सुविधांचा लाभ

आरोग्य पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधानांच्या सर्वांगीण दृष्टिकोनाचा गृहमंत्र्यांनी केला पुनरुच्चार

प्रविष्टि तिथि: 26 SEP 2022 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2022

 

गुजरातच्या अहमदाबादमधील सानंद येथे केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज 350 खाटांच्या (500 खाटांपर्यंत सुसज्ज करण्यायोग्य) ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालयाची पायाभरणी केली. 350 खाटांच्या रुग्णालयात ओपीडी, अंतर्गत सुविधा, एक्स-रे, रेडिओलॉजी, प्रयोगशाळा, ऑपरेशन थिएटर, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ सुविधा, आयसीयू आणि अल्ट्रासाऊंडसह इतर आधुनिक सुविधा असतील. 9.5 एकरावरील रुग्णालयाच्या बांधकामासाठी 500 कोटी रुपये खर्च येईल. ते लवकरच आवश्यकतेनुसार 500 खाटांच्या रुग्णालयात अद्ययावत केले जाऊ शकते. हे रुग्णालय सानंदच्या ग्रामस्थांसह 12 लाख कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

    

गृहमंत्री, अमित शाह यांनी, आरोग्य पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधानांच्या त्रिस्तरीय सर्वांगीण दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला ज्यामध्ये वैद्यकीय विज्ञान पायाभूत सुविधांचा विस्तार आणि मनुष्यबळ; आयुष सारख्या पारंपारिक भारतीय औषधांना मुख्य प्रवाहात आणणे; आणि तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे तज्ज्ञांची उपलब्धता वाढवणे यांचा समावेश होतो.

    

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1862281) आगंतुक पटल : 231
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Assamese , Gujarati , Tamil , Telugu