संरक्षण मंत्रालय
आयएनएस सुनयना सेशेल्समधे दाखल
संयुक्त सागरी बलांच्या सरावात भारतीय नौदलाचा पहिल्यांदाच सहभाग
Posted On:
26 SEP 2022 11:03AM by PIB Mumbai
ऑपरेशन सदर्न रेडीनेस ऑफ कम्बाईंड मेरिटाइम फोर्सेस (सीएमएफ) या वार्षिक प्रशिक्षण सरावात सहभागी होण्यासाठी आयएनएस सुनयना ही भारतीय युद्धनौका 24 सप्टेंबर 2022 रोजी पोर्ट व्हिक्टोरिया सेशेल्स येथे दाखल झाली. हिंद महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षेसाठी भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेला बळकटी देण्याबरोबरच, भारतीय नौदलाची युद्धनौका पहिल्यांदाच संयुक्त सागरी बलांच्या - सीएमएफच्या सरावात सहभाग होते आहे.
सीएमएफतर्फे आयोजित क्षमता उभारणीसंबंधी सरावांमध्ये सहयोगी भागीदार म्हणून ही युद्धनौका सहभागी होणार आहे. या संयुक्त सरावात अमेरीका, इटली, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंडची शिष्टमंडळे तसेच यूके, स्पेन आणि भारताच्या नौका सहभागी होणार आहेत.
आयएनएस सुनयनाच्या या बंदरावरील मुक्कामादरम्यान सहभागी राष्ट्रांशी व्यावसायिक संवादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
***
Madhuri P/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1862217)
Visitor Counter : 294