रेल्वे मंत्रालय
रेल्वेगाड्यांच्या स्थानकात येण्या-जाण्याच्या वेळेच्या ठावठिकाण्यासाठी भारतीय रेल्वेकडून नव्या तंत्रज्ञानाचा वापर
Posted On:
23 SEP 2022 8:10PM by PIB Mumbai
इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सहकार्याने, रेल्वेगाडीची प्रत्यक्ष वेळ माहिती प्रणाली (आरटीआयएस) विकसित करण्यात आली असून ही प्रणाली रेल्वेगाडीचे आगमन आणि प्रस्थान किंवा धावण्याच्या वेळेसह स्थानकांवर रेल्वेच्या येण्या जाण्याच्या वेळेचे स्वयंचलित संपादन करण्यासाठी इंजिनमध्ये स्थापित केली जात आहे. ही माहिती कंट्रोल ऑफिस ऍप्लिकेशन (सीओए) यंत्रणेमध्ये त्या रेल्वेगाड्यांच्या नियंत्रण तक्त्यावर परस्पर स्थापित केली जाते.
आरटीआयएस ही प्रणाली 30 सेकंदांच्या कालावधीने मिड सेक्शन अपडेट देत राहते. रेल्वे गाडी नियंत्रण आता कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय आरटीआयएस ही प्रणाली इंजिन /रेल्वेचे स्थान आणि वेगावर अधिक बारकाईने मार्ग निरीक्षण करू शकते .
21 इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये 2700 इंजिनांसाठी आरटीआयएस प्रणाली उपकरणे बसवण्यात आली आहेत. टप्पा-II च्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून, इस्रोच्या सॅटकॉम (Satcom) हबचा वापर करून 50 लोको शेडमधील आणखी 6000 इंजिनांमध्ये ही प्रणाली स्थापित करण्यात येणार आहे. सध्या, सुमारे 6500 इंजिनांचे (आरटीआयएस आणि आरईएमएमएलओटी) जीपीएसद्वारे प्राप्त माहिती थेट कंट्रोल ऑफिस ऍप्लिकेशनमध्ये (सीओए) दिली जात आहे. यामुळे सीओए आणि एनटीईएस एकत्रीकरणाद्वारे रेल्वेचा स्वयंचलित मार्ग नकाशा आणि प्रवाशांना प्रवाशांना प्रत्यक्ष वेळेची माहिती माहिती मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1861828)
Visitor Counter : 221