आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात भारताने साध्य केला महत्वपूर्ण टप्पा

Posted On: 23 SEP 2022 4:29PM by PIB Mumbai

 

भारताने बालमृत्यू दर आणखी कमी करत महत्वपूर्ण टप्पा साध्य केला आहे. भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी 22 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध  केलेल्या नमुना नोंदणी प्रणाली  सांख्यिकी अहवाल 2020 नुसार, 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न करताना 2014 पासून देशात बाल मृत्युदर,  5 वर्षांखालील मुलांचा मृत्युदर आणि नवजात बालक मृत्युदरात  लक्षणीय घट  होत आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी या कामगिरी बद्दल देशाचे अभिनंदन केले आणि बालमृत्यूचे प्रमाण  कमी करण्यासाठी अथक मेहनत घेतल्याबद्दल सर्व आरोग्य कर्मचारी, सेविका  आणि समुदाय  सदस्यांचे आभार मानले.

 

INDICATOR

SRS 2014

SRS 2019

SRS 2020

Crude Birth Rate (CBR)

21.0

19.7

19.5

Total Fertility Rate

2.3

2.1

2.0

Early Neonatal Mortality Rate (ENMR) – 0- 7 days

20

16

15

Neonatal Mortality Rate (NMR)

26

22

20

Infant Mortality Rate (IMR)

39

30

28

Under 5 Mortality Rate (U5MR)

45

35

32

 

नमुना नोंदणी प्रणाली  2020 ने दिलेल्या माहितीनुसार  2014 पासून सातत्याने घट होत आहे. महत्वपूर्ण उपाययोजनाकेंद्र-राज्य सरकारांची मजबूत भागीदारी आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बालमृत्यूसंदर्भातले  2030 शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सज्ज झाला आहे.

स्थिर घसरणीच्या कल कायम ठेवत बाल मृत्युदर,  5 वर्षांखालील मुलांचा मृत्युदर आणि नवजात बालक मृत्युदरात  आणखी घट झाली आहे :

देशातला 5 वर्षांखालील बालकांच्या मृत्यू दरात  (U5MR)  2019 पासून 3 अंकांची (वार्षिक घसरण दर: 8.6%) लक्षणीय घट झाली आहे (2020 मध्ये 1000 जन्मांमागे 32 च्या तुलनेत 2019 मध्ये 35 प्रति 1000 ). ग्रामीण भागात  36  तर शहरी भागात 21 पर्यंत त्यात बदल होत आहेत.

5 वर्षांखालील मुलींचा मृत्युदर (33 ) मुलांच्या  (31) तुलनेत  जास्त  आहे. त्याच कालावधीत 5 वर्षांखालील मुलांच्या मृत्युदरात  4 अंकांची आणि मुलींच्या  मृत्युदरात 3 अंकांची  घट झाली आहे.

5 वर्षांखालील वयोगटातील मृत्युदरात सर्वाधिक घसरण उत्तर प्रदेश (5 अंक ) आणि कर्नाटक (5 अंक ) राज्यात दिसून आली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002-000038DM.jpg

नवजात बालक मृत्यू  दरात 2019 मधील  1000 जन्मांमागे  30 च्या तुलनेत  2020 मध्ये 2 अंकांनी घट होऊन तो 28 प्रति 1000  झाला आहे (वार्षिक घसरणीचा  दर: 6.7%).

o       ग्रामीण-शहरी तफावत 12 अंकांपर्यंत कमी झाली आहे (शहरी 19, ग्रामीण-31).

o   2020 मध्ये कोणताही लिंगभेद आढळला नाही (पुरुष -28, महिला - 28).

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003-00004PUN.jpg

नवजात बालकांचा मृत्यू दर देखील 2019 मधील 1000 जन्मांमागे 22 वरून 2020 मध्ये 20 प्रति 1000 म्हणजेच 2 अंकांनी कमी झाला  आहे (वार्षिक घसरणीचा  दर: 9.1%).  शहरी भागात हे प्रमाण 12 तर  ग्रामीण भागात 23 पर्यंत आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004-0000Q7E6.jpg

एसआरएस 2020 अहवालानुसार,

सहा (6) राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी NMR (<=12 by 2030) आधीच  2030 पर्यंतचे  शाश्वत विकास उद्दिष्ट गाठले आहे: केरळ (4), दिल्ली (9), तामिळनाडू (9), महाराष्ट्र (11), जम्मू आणि काश्मीर (12) आणि पंजाब (12).

अकरा (11) राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी 2030 पर्यंत U5MR (<=25) चे शाश्वत विकास उद्दिष्ट  आधीच गाठले आहे: केरळ (8), तामिळनाडू (13), दिल्ली (14), महाराष्ट्र (18), जम्मू आणि काश्मीर (17), कर्नाटक (21), पंजाब (22), पश्चिम बंगाल (22), तेलंगणा (23), गुजरात (24), आणि हिमाचल प्रदेश (24).

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005-0000YII4.jpg

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1861746) Visitor Counter : 1529