संरक्षण मंत्रालय
लष्करी परिचर्या सेवेकडून सैन्यदले आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वोत्तम सेवेची आदर्श परंपरा कायम
Posted On:
22 SEP 2022 6:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022
लष्करी परिचर्या सेवा, भारतात शांतता काळात आणि प्रत्यक्ष सैन्यस्थळे तसेच परदेशातील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमधे सैन्यदले आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वोत्तम सेवा देत आहे, असे लष्करी रुग्णालयाचे (आरआर) कमांडंट लेफ्टनंट जनरल अशोक जिंदाल यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथे परिचर्या महाविद्यालय, लष्करी रुग्णालयाच्या (आर अँड आर) पाचव्या तुकडीच्या परिचर्या पदवीधरांच्या नियुक्ती (कमिशनिंग) समारंभात ते आज प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
तरुण लेफ्टनंट्सनीं परिचर्या सेवेची प्रतिष्ठा आणि नैतिकता टिकवून ठेवावी आणि प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आवाहन लेफ्टनंट जनरल अशोक जिंदाल यांनी केले. लष्करी परिचर्या सेवेच्या अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल स्मिता देवराणी यांनी नव्याने नियुक्त झालेल्या परिचर्या अधिकाऱ्यांना सेवेची शपथ दिली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत परिचर्या पदवीधरांचा सत्कार करण्यात आला.
या समारंभाला ज्येष्ठ अधिकारी-कर्मचारी आणि नवनियुक्त परिचर्या अधिकाऱ्यांचे पालक उपस्थित होते.
R.Aghor /V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1861556)
Visitor Counter : 230