प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार
भारताचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार आणि ब्रिटीश उच्चायुक्त यांच्या हस्ते ‘शी इज - वुमन इन स्टीम’ पुस्तकाचे प्रकाशन
Posted On:
22 SEP 2022 12:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022
भारताचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार , प्रा. अजय सूद आणि ब्रिटीश उच्चायुक्त ॲलेक्स एलिस यांच्या हस्ते 21 सप्टेंबर 2022 रोजी एल्सामेरी डिसिल्व्हा आणि सुप्रीत के सिंग लिखित ‘ शी इज - वुमन इन स्टीम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक प्रकाशित केले आहे. यात स्टिम (STEAM, अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि गणित) या क्षेत्रात श्वाश्वत विकासाधारीत, नेतृत्व करीत, उल्लेखनीय कार्य केलेल्या 75 महिलांचा गौरव केला आहे. धैर्य, आशावाद आणि दृढनिश्चयाच्या वैयक्तिक कथा यात आहेत. अतिशय खडतर परिस्थिती असतानाही वैयक्तिक आणि व्यावसायिक संघर्ष केलेल्या महिलांच्या कार्याची माहिती हे पुस्तकातून मिळते. यापैकी कोणत्याही शाखेत काम करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक मुलीसाठी त्या नक्कीच आदर्श आहेत. येथे STEAM मधील 75 महिलांबद्दल अधिक वाचता येईल .
भारताच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, एफआयसीसीआय, एफएलओ आणि ब्रिटिश उच्चायुक्तालय यांच्याद्वारे प्रकाशित हे पुस्तक केवळ लिखित स्वरूपातच नाही तर त्यात यश मिळवलेल्या सर्वांच्या ध्वनिचित्रफीतीही आहेत. क्यूआर कोडचा वापर करुन त्या पाहता येतील.
"भारत आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारतातील तरुणींची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. सरकार याच आधारावर आपल्या विविध धोरणांद्वारे प्रयत्न करत आहे. यापैकी एक आहे 5 वे विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषी धोरण. आपण सर्वांनी यावर विचार करणे आवश्यक आहे. जेणेकरुन विज्ञान क्षेत्रातील तरुण मुली आणि महिलांना अधिक न्याय्य संधी आणि कामगिरीसाठी स्वागतार्ह जागा मिळाव्यात यासाठी हे धोरण आपल्या संस्थांनी पुरेशा प्रमाणात अंमलात आणलायला हवे, असे भारताचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय सूद यांनी पुस्तक प्रकाशन करताना सांगितले.
“स्त्रिया आणि तरुण मुलींसह प्रत्येकासाठी संधी उपलब्ध करून देणे, प्रत्येक देशाला अधिक सशक्त आणि बुध्दीवान बनवते. म्हणूनच ब्रिटीश सरकारने 300 हून अधिक तरुण भारतीय महिला वैज्ञानिकांना आणि STEM मधील नवसंशोधकांना त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी पाठबळ दिले आहे.” असे भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त ॲलेक्स एलिस यांनी याप्रसंगी सांगितले.
S.Bedekar/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1861426)
Visitor Counter : 427