शिक्षण मंत्रालय

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) म्हणजे वैज्ञानिक वृत्ती निर्माण करणारी आणि मानवतेचे भविष्य घडवणारी मंदिरे - धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

Posted On: 19 SEP 2022 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2022

 

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मद्रासचा 2021-27 धोरणात्मक आराखडा प्रसिद्ध केला ज्यात संस्थेसाठी महत्त्वाकांक्षी वाढीचा टप्पा आणि मूलभूत विज्ञान आणि कोटक-आयआयटी (M) ऊर्जा बचत अभियानासाठी समर्पित एम्फसिस केंद्र प्रस्तावित आहे. एमएसएमईंना ऊर्जेचा वापर कमी करण्यात मदत करण्यासाठी कोटकच्या सीएसआर निधीच्या मदतीने स्थापन करण्यात आलेले ‘कोटक आयआयटीएम ऊर्जा बचत’ अभियान देखील त्यांनी सुरू केले आणि सेंटर फॉर क्वांटम इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन अँड कॉम्प्युटिंग (CQuICC) च्या वाढीस पाठिंबा दिल्याबद्दल एम्फसिस चमूचा सत्कार केला. डेटा सायन्समधील बीएससी प्रोग्रामच्या निवडक विद्यार्थ्यांना त्यांनी पदविका प्रमाणपत्रही प्रदान केले.

आयआयटी  मद्रासने विकसित केलेल्या आणि टीव्हीएस मोटर कंपनीने पाठबळ दिलेल्या स्वदेशी जीडीआय अर्थात गॅसोलीन डायरेक्ट इंजेक्शन इंजिनचे आणि आयआयटी (M) मध्ये तयार केलेल्या कमी किमतीच्या भाजीपाला गाडीचे उद्घाटनही मंत्र्यांनी केले.

शैक्षणिक उत्कृष्टता आणि राष्ट्र उभारणीच्या दिशेने या उपक्रमांचे उद्घाटन आणि शुभारंभ केल्याबद्दल यावेळी प्रधान यांनी सर्वांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, आयआयटी या केवळ शैक्षणिक संस्था नाहीत तर त्या वैज्ञानिक वृत्ती निर्माण करणारी आणि मानवतेचे भविष्य घडवणारी मंदिरे आहेत. ते पुढे म्हणाले की, आपल्या समाजाला आयआयटीकडून खूप अपेक्षा आहेत. आमच्या आययटीयनांनी वाढ आणि विकासाचे ध्वजवाहक असले पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.

प्रधान म्हणाले की, भारतामध्ये समाजाचे देणे फेडण्याची संस्कृती आहे आणि भारत समाजाच्या भल्यासाठी नवोन्मेष करतो. आयआयटी मद्रासच्या तांत्रिक सामर्थ्यामुळे, भारत 2023 च्या अखेरीस स्वदेशी 5G आणणार आहे.

ते पुढे म्हणाले की, आयआयटीमधील प्रतिभावंत मला खूप आत्मविश्वास देतात. आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोबल वाढवणे, त्यांची ‘चेतना’ पुन्हा जागृत करणे आवश्यक आहे. त्यांना व्यापक विचार करावा लागेल, सामाजिक बदल घडवून आणावा लागेल आणि त्यांनी नोकरी शोधणार्‍यांपेक्षा नोकरी देणारे बनले पाहिजे, असेही ते म्हणाले.

 

* * *

R.Aghor/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1860686) Visitor Counter : 143