युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर अमृतसरमधील गुरु नानक देव विद्यापीठाच्या खेळाडूंना उद्या सन्मानित करणार
Posted On:
19 SEP 2022 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2022
केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर सप्टेंबर 20 रोजी अमृतसरमधील गुरु नानक देव विद्यापीठाच्या (जीएनडीयु) वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभात विद्यापीठाच्या खेळाडूंचा सत्कार/सन्मान करतील.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर सप्टेंबर 20, 2022 रोजी अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठाच्या (जीएनडीयु) 52 व्या वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभात, खेलो इंडिया आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेच्या विविध क्रीडा प्रकारांमध्ये चांगली कामगिरी करून विद्यापीठाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करतील. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंचा रोख पारितोषिकाने तर एकंदर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येईल.
गुरु नानक देव विद्यापीठाने क्रीडा क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली असून भारताला 23 वेळा मौलाना अबुल कलाम आझाद करंडक जिंकून देण्याची विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. विद्यापीठाने आतापर्यंत अर्जुन पुरस्कार प्राप्त 35, पद्मश्री पुरस्कार प्राप्त 6 आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त 2 खेळाडू दिले आहेत. दर वर्षी शारीरिक शिक्षण विभाग (शिक्षण विभागा अंतर्गत) 90 पेक्षा जास्त गुरु नानक देव विद्यापीठ आंतर महाविद्यालय (पुरुष आणि महिला) अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करते आणि विद्यापीठाचे 70 पेक्षा जास्त संघ (पुरुष आणि महिला) अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पाठवते. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने विद्यापीठ परिसरात हॉकी आणि हँडबॉल या क्रीडा प्रकारांसाठी खेलो इंडिया केंद्र तर तलवारबाजी आणि नेमबाजी या क्रीडा प्रकारांसाठी खेलो इंडिया अकादमींची स्थापना केली आहे.
* * *
R.Aghor/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1860643)
Visitor Counter : 163