शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तंजावूरमधील शास्त्र विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला धर्मेंद्र प्रधान यांची उपस्थिती


जागतिक नागरिक घडवण्यासाठी भारतीय भाषा आणि भारतीय ज्ञान प्रणालीवर भर देण्याचे धर्मेंद्र प्रधान यांचे आवाहन

Posted On: 18 SEP 2022 8:46PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकासमंत्री धर्मेंद्र प्रधान आज तंजावूर  येथील शास्त्र विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिले. माहिती आणि प्रसारण, मत्स्योद्योग पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री एल मुरुगन हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

2022-09-18 17:11:26.976000 2022-09-18 17:26:35.471000

ज्ञानाचे मंदिर म्हणून शास्त्र विद्यापीठाने आपले नाव सार्थ केले आहे आणि ज्ञानाच्या क्षेत्रात सर्वोत्तम गुणवत्तेचे दर्शन घडवले आहे, असे धर्मेंद्र प्रधान यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले.

एक संस्कृती म्हणून पुढील 25 वर्षांमध्ये भारताची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे आणि आपल्या सभ्यतेचा वारसा जतन करण्यात आणि त्याचे संवर्धन करण्यामध्ये त्याचबरोबर जागतिक कल्याणासाठी भारतीय ज्ञान प्रणालीला चालना देण्यामध्ये विद्यार्थी प्रमुख भूमिका बजावणार आहेत, असे ते म्हणाले. शास्त्र विद्यापीठाने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चे मुख्य प्रसारक सुद्धा बनले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

2022-09-18 17:27:17.6880002022-09-18 17:27:17.750000 

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 भविष्याचा वेध घेणारे आणि भारतीय मूल्ये रुजवणारे आणि भारतीय भाषांवर भर देणारे असल्याने जागतिक नागरिक घडवणारे एक तत्वज्ञानी दस्तावेज आहे असे शिक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केले. भारतीय भाषा आणि भारतीय ज्ञान प्रणालीवर यावर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधान यांनी तंजावूर वेस्ट सर्वोदय केंद्रम येथे महात्मा गांधी यांना अभिवादन केले. आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी सर्वांना खादीचा अंगिकार करण्याचे आवाहन केले.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1860426) Visitor Counter : 230